महाशिवरात्र जवळ आल्यामुळे मंदिर पायऱ्यांवर लोखंडी बॅरिकेट लावणे सुरू केले आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी वैद्यनाथ एक ज्योतिर्लिंग असल्याने येथील प्रभू वैद्यनाथच्या दर्शनासाठी राज्य व परराज्यातून भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. तसेच गेल्या दोन दिवसात दोन विशेष रेल्वे गाड्या सुरू झाल्याने भाविकांची संख्या वाढली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रभू वैद्यनाथाचे मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२० मध्ये ८ महिने बंद राहिले. मार्चपासून बंद राहिलेले मंदिर नोव्हेंबरमध्ये दिवाळीपासून उघडले आहे. नोव्हेंबरपासून भाविकांच्या चेहऱ्यास मास्क व हातावर सॅनिटायझर बंधनकारक करूनच मंदिरात भाविकाना प्रवेश दिला जात आहे. भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसरातील साहित्याची दुकाने व हॉटेल पुन्हा गजबजली आहेत. परळी रेल्वे स्थानकातून नांदेड - बेंगळुरू, बंगळुरू - नांदेड, काकिनाडा - शिर्डी, शिर्डी - काकीनाडा, नांदेड - पनवेल, पनवेल - नांदेड, औरंगाबाद - हैदराबाद, हैदराबाद - औरंगाबाद या एक्स्प्रेस रेल्वे गाड्या रेल्वे रुळावरून सुरळीत धावत आहेत.
वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 4:21 AM