परळी : तालुक्यात बुधवारपर्यंत आरोग्य विभागाच्यावतीने अतापर्यंत ३५ हजार ८२८ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील लाभार्थ्यांचा समावेश जास्त आहे. शहरातील लसीकरण केंद्रामध्ये १६ हजार ७६८ नागरिकांनी लसीचा डोस घेतला, तर ग्रामीण भागातील पाच आरोग्य केंद्रांमध्ये १९ हजार ६० ग्रामस्थांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.
परळी आरोग्य कार्यालयाच्यावतीने गुरुवारी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज मंदिरात कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यात आला. हा डोस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. रांगेत उभे राहून नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला. तर शुक्रवारी कोव्हॅक्सिन लसीचा फक्त दुसरा डोस परळी तालुक्यात दिला जाणार आहे. शहरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र मोहा, पोहनेर, सिरसाळा, धर्मापुरी, नागापूर येथे सकाळी ११ ते २ वाजेदरम्यान कोव्हॅक्सिनचा फक्त दुसरा डोस दिला जाणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे यांनी दिली. तालुक्यात मागील काही दिवसांपासून लसीकरण केंद्रावर बुधवारपर्यंत ३५ हजार ८२८ नागरिकांनी लस घेतल्याची नोंद झाली आहे. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी परळी तालुका आरोग्य कार्यालयातील सर्व कर्मचारी, अधिकारी मेहनत घेत आहेत.
लसीकरण
प्राथमिक आरोग्य केंद्र
धर्मापुरी ४३२२
मोहा २८४५
नागापूर ४४१८
पोहनेर २६०२
सिरसाळा ४८७३
परळी शहर १६७६८
===Photopath===
130521\img-20210513-wa0612_14.jpg~130521\img-20210513-wa0614_14.jpg