....
नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे
वडवणी : कोरानाचा धोका संपूर्णतः कमी झाला नसल्याने, नागरिकांनी मास्कचा वापर करावा. फिजिकल डिस्टन्स राखावा. सॅनिटायझरचा वापर करावा, अशा नियमांचे काटेकोर पालन करून प्रत्येकाने स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेच आहे. अनावश्यक घराबाहेर पडू नये, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.एम.बी.घुबडे यांनी केले आहे.
...
शेतात किंवा घरासमोर होतात विवाह सोहळे
वडवणी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात विवाह सोहळ्यासाठी मंगल कार्यालय व मंदिराऐवजी शेतास पसंती दिली जात आहे. बहुतांश विवाह सोहळे शेतात होताना दिसत आहेत. साध्या पद्धतीने शेतात छोटासा मंडप टाकून विवाह होत आहेत. त्यामुळे अनावश्यक खर्चाला आळा बसला आहे. मोजक्याच नातेवाईक, आप्तेष्टांच्या उपस्थितीत विवाह होत आहेत.
...
उकाड्यामुळे नागरिक त्रस्त
वडवणी : दोन दिवसांपासून तालुक्यात कधी ढगाळ वातावरण तर कधी कडक उन्ह पडत आहे. यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांनी कूलर, पंख्यांचा आधार घेत, उकाड्यापासून सुटका करून घेतली. चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने वातावरणात बदल झाला आहे.
....