लोकमत न्यूज नेटवर्कबीड : धारूर तालुक्यातील गावंदरा येथे सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी केवळ चौघांचे पथक गेले. आरोपीला पकडणे तर दुरच उलट त्यांचा मार खाऊन परतणाºया धारूर पोलिसांच्या कामगिरीवर संशय व्यक्त केला जात आहे. त्यांचा या मागचा नेमका उद्देश काय होता? याबाबत तर्कवितर्क लावले जात असून पोलीस उपनिरीक्षकांची खात्याअंतर्गत चौकशी लागल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, निष्काळजीपणामुळे विलास बडेने पलायन केले होते, त्यानंतर याप्रकरणातही आरोपीने पलायन केले आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला भाऊसाहेब राठोड हा सराईत गुन्हेगार आहे. तो गावंदरा येथे असल्याची माहिती मिळताच धारूर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत घोळवे हे इतर तीन कर्मचाºयांसह गावंदरा तांड्यावर गेले. सहज जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु अचानक मोठा जमाव अंगावर आला आणि पोलिसांच्या हातातील आरोपी सहज पळवून नेला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर पोलिसांना उसाने मारले. तशी फिर्याद धारूर ठाण्यात नोंद आहे.
त्यानंतर गुन्हा दाखल झाला. परंतु धारूर पोलिसांच्या कामगिरीबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. या सर्वांची उपविभागीय पोलीस अधिकाºयांमार्फत चौकशी सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. यामुळे धारुर पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे.यापूर्वीही ठाण्यातून गुन्हेगाराचे पलायनदोन महिन्यापूर्वी धारूर पोलीस ठाण्यातून विलास बडे नामक अट्टल गुन्हेगाराने पलायन केले होते.पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडून दिलेल्या आरोपीला धारूर पोलिसांना सांभाळण्यात अपयशी ठरले होते. आता पुन्हा गावंदरा प्रकरण घडल्याने येथील पोलिसांच्या कामगिरीबद्दल टीका होत आहे.
पीआय, पीएसआयच्या बोलण्यात तफावतपोउपनि घोळवे म्हणतात, आम्ही केवळ चौकशीसाठी गेलो होतो. आरोपी असल्याची माहिती नव्हती. तर पोनि गंधम म्हणतात, आरोपीला पकडण्यासाठीच आमचे कर्मचारी गेले होते. दोघांच्या बोलण्यात तफावत असल्याने संशायाची दोरी बळकट बनत चालली आहे. आता यामध्ये काय तथ्य? हे तपासातूनच समोर येणार आहे.
काय म्हणतात अधिकारी?कर्मचारी आरोपीला पकडण्यासाठी गेले होते. याची कल्पना दिली होती. पुरेसा फोर्सही होता. आरोपीला पकडण्यापुर्वीच त्यांनी हल्ला केल्याचे समजले. सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. -सुरेश गंधमपोलीस निरीक्षक, धारूर
आम्ही चौकशीसाठी गेलो होतो. आरोपीलाही पकडले होते. परंतु जमावाने आमच्या हातून त्याला पळविले. उलट आमच्यावर हल्ला केला. तो आरोपी तिथे आहे, हे आम्हाला माहिती असते, तर जास्त फोर्स नेला असता. आमच्याकडे कमी फोर्स होता आणि ते लोक जास्त होते.-चंद्रकांत घोळवेपोलीस उपनिरीक्षक, धारूर