बीड : ‘आला रे आला गणपती आला’, ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष आणि गुलालची उधळण करीत सोमवारी जिल्हाभरात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांनी श्रींची स्थापना केली. दुष्काळी सावट असताना पोळ्यापासून झालेल्या थोड्याफार पावसामुळे साजरा होणाऱ्या गणेशोत्वाचे रुप पालटल्याचे दिसून आले. ‘बाप्पा धाव रे पाऊस पाड रे’ अशी प्रार्थना प्रत्येक गणेशभक्त करत होता. दिवसभरात शंभरपेक्षा जास्त मंडळांनी तर शेकडो घरात श्रीं ची स्थापना करण्यात आली. जिल्ह्यात सर्वत्र श्रीं ची स्थापना उत्साहात करण्यात आली.यावर्षी जूनपासूनच पावसाने ओढ दिली. आॅगस्टच्या शेवटच्या दोन दिवसात व सप्टेंबरच्या पहिल्या दिवशी पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले. त्याचबरोबर नैराश्यदेखील काही प्रमाणात धूवून निघाले. त्यामुळे रविवारपासून गणेश मूर्ती, आरास, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी बाजारात वर्दळ दिसून आली.सोमवारी सकाळपासूनच सिद्धी विनायक संकुलातील मूर्ती बाजारात गणेश भक्तांची लगबग सुरु होती. ५० रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंतच्या विविध आकारातील मूर्ती बाजारात उपलब्ध होत्या. शाडूच्या मूर्तींना मागणी होती परंतू आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने ग्राहक खिशाचाही विचार करत होते. आकर्षक, रेखीव, सुबक, मनाला भावणाºया मूर्ती खरेदी सुरु होती. बाप्पाला आणण्यासाठी अनेक भक्त सहकुटुंब आल्याचे पहायला मिळाले. दुचाकी, रिक्षा, मालवाहू रिक्षा, टेम्पो, जीप, टॅक्टर, ट्रक, बैलगाडीतून वाजत गाज बाप्पांचे स्वागत करण्यात आले. डफडे, ताशा, ढोलीबाजा, बॅन्ड आणि गणपती बाप्पांचा गजर कानी पडत होता. अनेकांनी डोईवर घेतलेल्या पाटावर गणेश मूर्ती ठेवून बाप्पांना घरी नेले. मूर्तीसाठी लागणाºया कच्च्या मालाचे भाव वाढल्याने बाजारात मूर्तीचे भाव २० टक्क्यांनी वाढले होते.
बाप्पा, पाऊस पाड रे..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 11:39 PM
‘बाप्पा धाव रे पाऊस पाड रे’ अशी प्रार्थना प्रत्येक गणेशभक्त करत होता. दिवसभरात शंभरपेक्षा जास्त मंडळांनी तर शेकडो घरात श्रीं ची स्थापना करण्यात आली. जिल्ह्यात सर्वत्र श्रीं ची स्थापना उत्साहात करण्यात आली.
ठळक मुद्देबीड जिल्हाभरात श्री ची स्थापना उत्साहात : दोन दिवसांच्या पावसाने चैतन्य