जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ७ कडे जाणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याच्या लाईनला शुक्रवारी रात्री अज्ञाताने छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच काही नातेवाईक पॅनिक होऊन स्वत:च सिलिंडर घेऊन रुग्णांना लावत आहेत. तर काही लोक ऑक्सिजन फ्लो स्वत:च कमी-जास्त करीत आहेत. हे सर्व चुकीचे आहे. ऑक्सिजन कमी पडला किंवा जास्त झाला तरी रुग्ण दगावू शकतो. परिस्थिती थोडी गंभीर आहे. त्याचा सामना आपण सर्वजण मिळून करीत आहोत. प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. परंतु, काही लोक ऑक्सिजनचा खेळ करत आहेत. हे चुकीचे आहे. ऑक्सिजन बंद पडला म्हणून रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करतात. परंतु, सात मिनिटांपेक्षा जास्त वेळ ऑक्सिजन भेटला नाही तर तो दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणीही त्याच्याशी छेडछाड करून जिवाशी खेळ खेळू नये, असे आवाहनही डॉ. गित्ते यांनी केले. जर कोणी असे करताना निदर्शनास आले तर थेट कारवाई करण्याचा इशाराही सीएस डॉ. गित्ते यांनी दिला आहे.
त्या दोघांचा मृत्यू ऑक्सिजन बंदमुळे नाहीच
ऑक्सिजन पुरवठा ७ मिनिटे न भेटल्यास रुग्णाचा मेंदू खराब होतो आणि पुढील तीन मिनिटांत तो दगावण्याची शक्यता असते. शुक्रवारी रात्री ऑक्सिजन बंद केल्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप खोटा आहे. तसेच असते तर इतर ३० रुग्णांनाही त्रास झाला असता. असा काहीही प्रकार घडला नव्हता, असा खुलासा डॉ.गित्ते यांनी केला, तर एसीएस डॉ. सुखदेव राठोड यांनी पाच मिनिटांसाठी पुरवठा बंद झाल्याची प्रतिक्रिया शनिवारी दिली होती. यात खरे कोण? आणि खोटे कोण? हा प्रश्न कायम आहे.
..
परिस्थिती गंभीर आहे. ऑक्सिजन, खाटा, औषधी उपलब्ध करून रुग्ण जगला पाहिजे, यासाठीच यंत्रणा धावपळ करत आहे. परंतु, काही लोक वाद घालत असून उपचारातही हस्तक्षेप करत आहेत. आता हे खपवून घेतले जाणार नाही. ऑक्सिजनशी तर कोणीच छेडछाड करू नये, अन्यथा कारवाई केली जाईल. सर्वांनी मिळून कोरोनाविरुद्धचा लढा जिंकायचा आहे, त्यामुळे सहकार्य करावे.
डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड.
----
===Photopath===
250421\25_2_bed_9_25042021_14.jpg
===Caption===
डॉ.सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्य चिकित्सक बीड