--------------
काटेरी झुडुपे वाढली
अंबाजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यानजीक काटेरी झुडुपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला व रस्त्याच्या कडेला पाणी साठलेले राहिल्याने परिसरात काटेरी झुडुपांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आता वाढलेली ही झुडपे रस्त्यावर आल्याने दुचाकी व चार चाकी वाहनचालकांना वाहन चालवितांना मोठा त्रास होत आहे. अनेकांना या काटेरी झुडपांमुळे इजाही झालेली आहे.
-----
आठ तास वीज पुरवठ्याची प्रतीक्षा
अंबाजोगाई : नवीन कृषीपंप वीज धोरणात शेतक-यांना आठ तास वीज देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. अशी घोषणा ऊर्जामंत्र्यांनी केली. परंतु अद्याप शेतक-यांना दिवसा आठ तास वीजपुरवठा देण्याच्या धोरणाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. अजूनही रात्रीच्या वेळी वीजपुरवठा सुरूच आहे. शेतक-यांना रात्री जागून रब्बी हंगामातील पिकांना पाणी द्यावे लागत आहे.
------------
दंड होत नसल्याने बेफिकीरी वाढली
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन तालुक्यात होत नाही. प्रशासनही याबाबत उदासीन आहे. अंबाजोगाई नगर परिषद प्रशासन व पोलीस ठाण्याच्या वतीने एक दिवस मास्क न वापरणा-या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर कारवाईचे सत्र एक दिवसांतच संपले. नागरिकांनाही दंड होत नसल्याने त्यांच्यात बेफिकीरी वाढली आहे.