लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : तालुक्यातील अरणवाडी साठवण तलावास अतिवृष्टीमुळे धोका निर्माण झाला आहे. तलावाच्या पश्चिमेस असणाऱ्या विहिरीजवळील भाग खचल्याने साठवण तलाव फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. तलावातील पाणी कमी करण्यासाठी सांडवा पुन्हा फोडण्याची वेळ येणार आहे. यामुळे पाटबंधारे विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. या तलावाखाली येणाऱ्या गावांतील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अरणवाडी साठवण तलाव पहिल्याच वर्षी भरला आहे. अजून पाऊस सुरूच आहे. तलावाला धोका होऊ नये, या भीतीने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी २५ जुलैला या तलावाचा सांडवा फोडला. मात्र, या तलावाखालील पाच गावांतील ग्रामस्थांच्या विरोधामुळे सांडवा ७ ऑगस्टला पूर्ववत बांधण्यात आला. गेल्या आठ दिवसांपासून सतत होणाऱ्या पावसामुळे तलाव भरगच्च पुन्हा भरला आहे. तलावाचे काम जुने आहे. परंतु तलावाच्या पश्चिमेकडे तलावाखाली असणाऱ्या विहिरीजवळील भाग खचण्यास सुरूवात झाली आहे. काळी माती व गढूळ पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जात आहे. यामुळे तलाव फुटण्याची भीती निर्माण झाली आहे.
...
पुन्हा सांडवा फोडणार
अरणवाडी तलावाचे जुने व नवे काम एकत्रित असल्याने ही भीती निर्माण झाली आहे. तलावाच्या सुरक्षिततेसाठी पाटबंधारे विभाग सांडवा पुन्हा फोडण्याच्या तयारीत आहे. नागरिकांनी सुरक्षितता बाळगून पाटबंधारे विभागास सहकार्य करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यू. व्ही. वानखेडे यांनी केले आहे.
060921\img-20210906-wa0067.jpg~060921\img-20210906-wa0062.jpg
अरणवाडी साठवण तलावा चे विहरी जवळील मग खचू लागला~अतिवृष्टीमुळे अरणवाडी साठवण तलावास धोका