संडे स्टोरी
गेवराई (जि.बीड) तालुक्यातील गोदावरी नदीकाठावर असलेल्या राहेरी येथील गोदावरी नदीवर बानेगावकडे जाण्यासाठी पूल नही. याच नदीपात्रातून राहेरी, बानेगावसह आजूबाजूचे जवळपास दहा ते पंधरा गावांतील नागरिक नदीपात्रातून होडीद्वारे धोकादायक प्रवास करीत आहेत.
...
गेवराई तालुक्यातील गोदावरी काठावर असलेल्या राहेरी येथील गोदावरी नदीवर गेल्या अनेक वर्षांपासून पूलच नाही. राहेरी, तलवाडा, पांढरी, भोगलगाव, गंगावाडीसह तालुक्यातील विविध गावांतील नागरिक गोदावरी नदीपात्रातून बानेगावकडे (ता.घनसांगवी, जि.जालना) बोटीद्वारे जीवघेणा व धोकादायक प्रवास करून जात आहेत. बानेगाव, घनसांगवी या भागातील नागरिकांना तलवाडा बाजारपेठ जवळ आहे. या भागातील बानेगाव, सौंदलगाव, भोगगाव, अंतरवाली, कंधारी, मुरम, तीर्थपुरी, रामसगाव, शेवतासह असे मिळून जवळपास दहा ते पंधरा गावांतील नागरिक गोदावरी नदीतून बोटीद्वारे धोकादायक प्रवास करून दररोज ये-जा करतात. याच बोटीतून नागरिकासह दुचाकींचीही ने-आण करताना दिसत आहे. या नदीला नेहमी मोठ्या प्रमाणात पाणी असते. आता पावसाळ्याचे दिवस असल्यानेही गोदावरी नदीला पाणी आहे, तरीही नागरिक जीवघेणा प्रवास करीत आहेत. याकडे ना लोकप्रतिनिधींचे लक्ष, ना शासनाचे. काही दुर्घटना घडली, तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
...
गोदावरी नदीवर मोठा पूल उभारावा
गेल्या अनेक वर्षांपासून येथे गोदावरी नदीवर मोठा पूल उभारावा, अशी मागणी आहे, परंतु याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. येथे पूल झाल्यास गेवराई तालुक्यातून घनसांगवी तालुक्यात जाणे-येणे सुकर होईल. दळणवळण वाढेल. बाजारपेठही फुलेल. तरी येथे तातडीने पुलाची उभारणी करावी, अशी मागणी राहेरी येथील विक्रम लाड, गोविंद लाड, हरिभाऊ फलके, पांडुरंग डोंगरे, कृष्णा लाड यांच्यासह अनेक नागरिकांनी केली आहे.
180921\20210917_135502_14.jpg~180921\20210917_135439_14.jpg