शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
3
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
4
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
5
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
6
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
7
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
8
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
9
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
10
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
11
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
12
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
13
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
14
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
15
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
16
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
17
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
18
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
19
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
20
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

दुष्काळ जाहीर करण्यासाठी धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 11:37 PM

पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीचे पंचनामे तात्काळ करून दुष्काळ जाहीर करावा व दुष्काळासाठी असणाऱ्या उपाययोजना तात्काळ लागू कराव्यात, या मागणीसाठी राकाँच्या वतीने गुरुवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.

ठळक मुद्देराष्टÑवादीचा पुढाकार : आंदोलनस्थळी भजन, कीर्तन; करपलेल्या पिकांचे पंचनामे तात्काळ करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीचे पंचनामे तात्काळ करून दुष्काळ जाहीर करावा व दुष्काळासाठी असणाऱ्या उपाययोजना तात्काळ लागू कराव्यात, या मागणीसाठी राकाँच्या वतीने गुरुवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात वारक-यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात भजने व कीर्तनाच्या माध्यमातून दुष्काळाची मागणी केली. तर करपलेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी नंदकिशोर मुंदडा यांनी केली. यावेळी आंदोलकांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकाºयांना दिले.केज विधानसभा मतदारसंघात अंबाजोगाई, केज व नेकनूर परिसरात पेरणीनंतर पाऊस झाला नाही. कापसावर लाल्या रोग पडला आहे. तर पावसाअभावी सोयाबीनचे पीक करपले आहे. या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत. बोंड अळीचे रखडलेले अनुदान तात्काळ उपलब्ध करून द्यावेत, शेतकºयांनी आॅनलाईन पीकविमा भरला तो तात्काळ वाटप करण्यात यावा, घरगुती वीज बिल वाढ झाली रद्द करण्यात यावी. दुष्काळी स्थितीमुळे नादुरूस्त ट्रान्सफॉर्मरसाठी कृषी पंपांचे थकीत वीजबील भरण्याची सक्ती करू नये, नादुरूस्त ट्रान्सफॉर्मर तात्काळ बसवावेत, उसावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पंचनामे करून मदत मिळावी, जनावरांच्या चारा व पाण्याची व्यवस्था करावी, ज्या गावाला पिण्याच्या पाण्याची गरज आहे तिथे व्यवस्था व्हावी. शेतमजूरांना कामे उपलब्ध करून द्यावीत, तूर, उडीद, मूग, सोयाबीन, हरभरा, या पिकांची हमीभावात खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावेत, आदी मागण्या मांडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करुन राकाँच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी दिला आहे. यावेळी बाजार समिती सभापती मधुकर काचगुंडे, उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, पं.स. उपसभापती तानाजी देशमुख, नेताजी शिंदे, वैजनाथ देशमुख, नगरसेवक संतोष शिनगारे, दिनेश भराडिया, अ‍ॅड. संतोष लोमटे, राजकुमार गंगणे, शेख ताहेर आदींसह राकाँचे कार्यकर्ते सहभागी होते.हुमणी अळीच्या नुकसानीचे पंचनामे कराउसावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पंचनामे करुन मदत करण्यात यावी, जनावरांच्या चारा व पाण्याची व्यवस्था करावी, ज्या गावांना पिण्याची पाण्याची गरज आहे तेथे व्यवस्था करुन शेतमजूरांना कामे उपलब्ध करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.

टॅग्स :BeedबीडAmbajogaiअंबाजोगाईagitationआंदोलन