अंबाजोगाई उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता संजय देशपांडे यांच्या सूचनेनुसार उजनी कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता सचिन बागेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधान तंत्रज्ञ अंकुश कातकडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसरात धो धो पाऊस सुरू असतानासुद्धा पट्टीवडगाव ते धर्मापुरी या सहा किलोमीटर अंतरातील वीज वाहिनीची अंधारात चिखल तुडवत फिरून पाहणी करून दोन ठिकाणी झालेला बिघाड दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत केला. मध्यरात्री एक वाजता पट्टीवडगाव उपकेंद्रांतर्गत असलेल्या आठ गावातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
याकामी अंकुश कातकडे, एल. ई.गोमसाळे, अविनाश लव्हारे, बाळासाहेब फड, विठ्ठल गायकवाड, शिवराज नागरगोजे, नागेश तंबूड, राजू लव्हारे, पांडुरंग मुंडे यांनी मध्यरात्रीच्या अंधारात व भरपावसात परिश्रम घेऊन वीजपुरवठा सुरळीत केल्याबद्दल अधिकारी व परिसरातील ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
230921\img-20210923-wa0127.jpg
काम करणारे कर्मचारी