शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

शेतमजुराची मुलगी बनली जिद्दीने डॉक्टर

By admin | Published: March 22, 2017 1:21 AM

फरास यांच्यातर्फे सत्कार : कोल्हापुरात शिकणाऱ्या बीडच्या कन्येचे प्रेरणादायी यश

कोल्हापूर : घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. आई-वडील शेतमजूर. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिने दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केले. तिच्या या यशाची कहाणी ऐकून खासदार सुप्रिया सुळे यांनी तिची दखल घेतली आणि तिच्या मेहनतीला बळ मिळाले. अखेर ती डॉक्टर झाली. मनी बाळगलेली जिद्द पूर्णत्वास आली. याच कर्तृत्ववान डॉक्टर मुलीचा महापौर हसिना फरास यांनी सत्कार करून तिचे कौतुक केले. कोणाही विद्यार्थ्याला प्रेरणा देईल अशीच ही कहाणी असून या कहाणीची नायिका आहे सारिका रघुनाथ माने! बीड जिल्ह्यातील शेतमजुरी करणाऱ्या रघुनाथ माने यांची कन्या सारिका माने. तिने अतिशय गरिबीतून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. सारिकाला १० वी व १२ परीक्षेत ९० टक्के गुण मिळाले. एका शेतमजुराच्या मुलीला ९० टक्के गुण मिळाल्याची बातमी वर्तमानपत्रात छापून आली. ही बातमी खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाचनात आली. त्यांनी सारिकाला भेटायला बोलावले. तिचं कौतुक केले. तुला पुढे काय व्हायचे आहे, असे सुप्रिया सुळेंनी सारिकाला विचारले तेव्हा डॉक्टर व्हायचे असल्याचे तिने सांगितले. डॉक्टर होण्याची तिची जिद्द पाहून खासदार सुळे यांनी सारिकाच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी उचलली आणि तिला पुढील शिक्षणासाठी कोल्हापूरला पाठविले. तिला कोल्हापुरात वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. या शिक्षणासाठी लागणारा सर्व खर्च पुस्तके, राहण्याची व्यवस्था खासदार सुळे यांनी केले. सारिकाला आदिल फरास यांचीही बरीच मदत झाली. नुकतीच सारिका हिने बीएएमएस ही पदवी प्राप्त केली. सध्या सारिका खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस करत आहे. एका सामान्य कुटुंबातून मिळविलेल्या यशाबद्दल महापौरांनी विशेष कौतुक केले. मी ज्या समाजातून पुढे आली आहे. त्या गरीब समाजातील लोकांची मला सेवा करायची असल्याचे सारिकाने सांगितले. (प्रतिनिधी)