१, १६ , ४०, ७९०
२०२०-२१
१, ९३, ३०, ९४७
-----------
दारू
१,२२,८७,३०६
विदेशी
५८,२१,१३३
बीअर
४४,६३,३०१
---------------
बीड : मागील वर्षभरात काही महिने सोडले तर बाजारपेठ बंदच होती. मात्र असे असतानाही जिल्ह्यात दारू विक्रीचा आलेख चढताच राहिला आहे. जिल्ह्यात दोन वर्षांत ३ कोटी ९ लाख ७१ हजार ७४० लिटर दारू मद्य शौकिनांनी रिचवली आहे. त्यामुळे शासनाला महसूलही मोठ्या प्रमाणात मिळाला आहे. २०१९-२० मध्ये मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे संपूर्ण एप्रिल महिन्यात व मे च्या २६ दिवसांत दारू विक्री झाली नाही. तसेच २०२०-२१ मध्ये एप्रिल - मे महिन्यात ५० दिवस देशी, विदेशी, बीअर तसेच वाईनची विक्री होऊ शकली नाही. २०१९-२० च्या तुलनेत देशी दारूच्या विक्रीत २०२०-२१ मध्ये सुमारे १ लाख २२ हजार ४४६ लिटरची घट झाली. तर एप्रिलमध्ये बंद असतानाही विदेशी दारू मात्र २०२०-२१ मध्ये २०१९-२० च्या तुलनेत ४० हजार १३३ लिटर जास्त विकली.
२०१९ -२० या आर्थिक वर्षात ६२ लाख ४ हजार ८७६ लिटर देशी दारूची विक्री झाली. तर २०२०-२१ मध्ये ६० लाख ८२ हजार ४३० लिटर देशी दारू विकली. २०१९-२० मध्ये २८ लाख ९० हजार ५०० लिटर विदेशी दारूची विक्री झाली. या तुलनेत २०२०-२१ मध्ये २९ लाख ३० हजार ६३३ लिटर विदेशी दारूची विक्री झाली. या वर्षात विदेशी दारूच्या विक्रीत ४० हजार १३३ लिटरची वाढ झाली. दारू, विदेशी दारू विक्रीची ही स्थिती असतानाच २०१९-२० च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये ४ हजार १३९ लिटर वाइनची विक्री वाढल्याचे आकडे सांगतात.
बीअरची विक्री घटली, विदेशीची वाढली
मागील दोन वर्षांत बीअर विक्रीमध्ये कमालीची घट झाल्याचे दिसून येते. लॉकडाऊनमुळे बंद, थंड करण्याची सोय नसणे व अन्य कारणांमुळे ही घट झाल्याचे सांगण्यात येते.
थंड बीअर उपलब्ध होण्यात अडचणी असल्याने मद्य शौकिनांनी दारू, विदेशी दारूचा पर्याय निवडला.
२०१९-२० मध्ये २५ लाख ४५ हजार ४१४ लिटर बीअरची जिल्ह्यात विक्री झाली होती. मात्र २०२०-२१ मध्ये हा आकडा कमालीचा घसरला. सुमारे ६ लाख २७ हजार ५३० लिटर बीअरची विक्री कमी झाली.
-------------
३ कोटी २८ लाखांचा दारूसह मुद्देमाल जप्त
२०१९-२० व २०२०-२१ मध्ये एकूण १८४० गुन्हे नोंदले. १०९९ आरोपींना अटक झाली. अवैधरित्या विकली जाणारी दारू, हातभट्टी, रसायन व इतर मुद्देमाल या कारवायांत जप्त करण्यात आला. एकूण ३ कोटी २८ लाख ९६ हजार ३९९ रुपयांचा मुद्देमाल दोन वर्षांत जप्त केला आहे.
---------
महसूलला दारू विक्रीचा आधार
लॉकडाऊनमुळे बंद असल्याने मद्य विक्रीबरोबरच परवाने नूतनीकरणाच्या प्रक्रियेला अडथळे आले. त्यामुळे २०१९-२० मध्ये राज्य उत्पादन शुल्कच्या बीड विभागात ३ कोटी ३४ लाखांचा महसूल जमा झाला. हे प्रमाण उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ३४ टक्केच राहिले. या वर्षातील नूतनीकरण पुढील आर्थिक वर्षात झाल्याने २०२०-२१ मध्ये मात्र महसूल तुटीची कसर भरून निघाली. १२ कोटी ५२ लाखांचा महसूल जमा झाला. उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण १५५ टक्के राहिले.
------------
दोन महिन्यात ९७ कारवाया
लॉकडाऊन कालावधीत १ एप्रिल २०२१ पासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरात अवैध दारुविक्री विरोधात राबविलेल्या मोहिमेत ९७ गुन्हे नोंदविले असून ५२ आरोपींना अटक केलेली आहे. देशी विदेशी दारूचा मुद्देमाल व वाहनासह एकूण रुपये एक कोटी किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध धाबे, दारू विक्री केंद्रे तसेच हातभट्टीच्या ठिकाणांवर वारंवार विभागाकडून धाडी टाकण्यात येत आहेत. - नितीन धार्मिक, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, बीड.
-----------------