शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
3
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
4
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
5
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
6
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
7
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
8
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
9
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
10
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
11
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
12
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
13
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
14
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
15
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
17
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
18
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
19
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

साळेगावात दफनभूमीच्या वादात मृतदेहाची फरपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:38 AM

साळेगाव येथे जागेच्या वादातून मृतदेह ताटकळत ठेवण्याचा प्रकार समोर आला. शेवटी मंगळवारी सायंकाळी दफनविधी झाला.

लोकमत न्यूज नेटवर्ककेज : घराला लागलेल्या आगीत भाजलेला इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर करण्यात येणारा दफनविधी जागेच्या वादात खोळंबला होता. त्यामुळे मृतदेह जामा मशीदसमोर ठेवला होता. पुन्हा एकदा साळेगाव येथे जागेच्या वादातून मृतदेह ताटकळत ठेवण्याचा प्रकार समोर आला. शेवटी मंगळवारी सायंकाळी दफनविधी झाला.केज तालुक्यातील साळेगाव येथील गफूर हसन तांबोळी (६५) हे १० मार्च रोजी घराला लागलेल्या आगीत गंभीर भाजले होते. त्यांच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, ११ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान निधन झाले. त्यांचा दफनविधी करण्यासाठी मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास तांबोळी समाजाच्या कब्रस्थानमध्ये दफनविधी करण्यास शेजारील शेतकऱ्याने हरकत घेतली. त्यानंतर मृतदेह जामा मशीदसमोर ठेवण्यात आला. तांबोळी समाजातील युवकांनी जामा मशीद समोरील कब्रस्थानमध्ये दफनविधी करू द्या, अशी मागणी केली. मात्र मुस्लिम समाजाने ही मागणी फेटाळून लावली. परंपरेनुसार बाजारतळाचे शेजारी तांबोळी समाजाचे कब्रस्थान आहे. आता त्याठिकाणी लोकवस्ती झालेली आहे, असे म्हणत तांबोळी समाजाच्या कब्रस्थान शेजारील एका शेतकऱ्याने विरोध केला आहे.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच प्रभारी तहसीलदार सचीन देशपांडे, मंडळ अधिकारी दळवी, तलाठी इनामदार, पोनि सुनील बिर्ला, सपोनि श्यामकुमार डोंगरे, पोउपनि सुरेश माळी, परमेश्वर वखरे यांनी साळेगावात धाव घेतली. प्रशासनाकडून मध्यस्थी घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. केज-कळंब रस्त्यावरील शासकीय गायरान जमिनीतील सार्वजनिक स्मशानभूमीत दफनविधी करण्यात आला.काय आहे नेमका वाद ?तांबोळी समाजाच्या परंपरेनुसार त्यांच्या कब्रस्थानमध्ये मयत गफूर तांबोळी यांचा दफन विधी करू द्या, अशी विनंती करण्यात आली आहे. आम्ही ही मुस्लिम असून आमच्या नातेवाईकवरही जामा मशीदच्या परिसरातील कब्रस्थानमध्येच दफन करणार, अशी भूमिका घेतली आहे. तर जामा मशीदच्या कब्रस्थानमध्ये दफन करण्यास मुस्लिम समाजाने विरोध केला आहे. या जागेच्या वादात मयत गफूर तांबोळी यांचा दफनविधी रखडला होता.

टॅग्स :Deathमृत्यूSocialसामाजिकcommunityसमाज