लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यातील गढी येथील उड्डाण पुलावर टिप्परने मुरूम टाकण्याचे काम चालू आहे. यावेळी एकाच्या अंगावर टिप्पर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री घडली. अंगावर टिप्पर घालून जिवे मारल्याचा आरोप करीत आयआरबी विरोधात नातेवाईकांनी आंदोलन केले. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग अडविल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलसांच्या आश्वासनानंतर दुपारनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.शेख इसुफ शेख इब्राहिम (४२ रा.नांदुरहवेली ता.बीड) असे मयताचे नाव आहे.ते आय.आर.बीच्या कामावर सुपरवायझर म्हणून काम करत होते. सध्या गढी येथील उड्डाण पुलाचे मुरूम भरण्याचे काम चालू आहे.बुधवारी एक टिप्पर (जीजे. २६ टी ६५६२) मुरूम घेऊन पुलावर आला. याचवेळी येथे उभा असलेल्या शेख यांच्या अंगावर तो गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार समजताच नातेवाईकांनी धाव घेतली. पोलिसांनीही घटनास्थळी जात पंचनामा केला. त्यानंतर गुरूवारी सकाळी नातेवाईक आक्रमक झाले. हा अपघात नसून आयआरबीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शेख यांचा खून झाल्याचे केल्याचा आरोप केला. त्यानंतर मृतदेह असलेली रुग्णवाहिका घेऊन नातेवाईक सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील पाडळसिंगी येथील नवीन टोल नाक्यावर आले. येथे त्यांनी महामार्ग अडवून धरीत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जून भोसले यांनी धाव घेत प्रकरण हाताळले. तपास करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. दोन्ही बाजूने लांबच लांब रांगामुळे वाहतूक कोंडी झाली होती.
अंगावरून टिप्पर गेल्याने मृत्यू; ‘आयआरबी’विरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:27 AM
तालुक्यातील गढी येथील उड्डाण पुलावर टिप्परने मुरूम टाकण्याचे काम चालू आहे. यावेळी एकाच्या अंगावर टिप्पर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ठळक मुद्देजिवे मारल्याचा आरोप : गुन्हा दाखल करा; सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग अडविला