लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : येथील सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी मठ संस्थानचे मठाधिपती माजलगावकर महाराज यांचे शुक्रवारी (१० सप्टेंबर) रोजी दुपारी १ वाजता देहावसान झाले. ते ९४ वर्षांचे होते. गेल्या एक महिन्यापासून श्री माजलगावकर महाराज शारीरिक व्याधीग्रस्त होते.
आठ दिवसांत त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. दरम्यान, शुक्रवारी दुपारी १ वाजता त्यांनी माजलगाव येथील मठात अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, माजलगावकर महाराजांच्या पार्थिवावर ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मठाच्या आवारातच समाधी विधी करण्यात येणार आहे. गेल्या सहा-सात दशकात देशातील वीरशैव समाजाच्या झालेल्या जडण-घडणीत सिंहाचा वाटा उचलणाऱ्या माजलगावकर महाराजांनी वीरशैव समाजाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. २ डिसेंबर १९२७ साली गुलबर्गा जिल्ह्यातील परुताबाद येथे संगम्मा व श्री शिवलिंगय्या हिरेमठ स्वामी यांच्या उदरी त्यांचा जन्म झाला.
१९५४ साली माजलगाव मठाची सूत्रे स्वीकारलीnपरुताबाद, सोलापूर येथे आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९५४ साली माजलगाव मठाची सूत्रे त्यांनी स्वीकारली. nसूत्रे हाती घेतल्यानंतर गेल्या सात दशकांमध्ये महाराजांनी माजलगाव मठासह समग्र वीरशैव समाजाला मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली. औरंगाबाद, बीड, कपिलधार, बार्शी, गेवराई आदी ठिकाणी माजलगाव मठाचा विस्तार केला.