लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी रात्री मीरा रामेश्वर एखंडे या महिलेचा प्रसुती दरम्यान बाळासह मृत्यू झाला होता. यास डॉक्टरांची हलगर्जीच जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. हे प्रकरण दडपविण्यासाठी नातेवाईकांच्या इच्छेविरोधात दबावतंत्र वापरुन मध्यरात्री १ वाजताच मीरा यांचे शवविच्छेदन केले. डॉक्टरांच्या सर्व हालचालीवरून या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळण्याची शक्यता आहे.पाथरी तालुक्यातील अंधापुरी येथील रहिवासी असलेले रामेश्वर भगवानअप्पा एखंडे हे गेल्या २५ वर्षांपासून माजलगाव येथे स्थायिक आहेत. हलाखीची परिस्थिती असल्याने पानटपरीच्या व्यवसायातून ते उपजीविका भागवतात. त्यांचे २० वर्षांपूर्वी परळी येथील मीरा यांच्याशी विवाह झाला. आतापर्यंत त्यांना ७ मुली झाल्या. कमी शिक्षण व अज्ञान असल्याने त्यांना वंशाला दिवा म्हणून मुलगा हवा होता. आजपर्यंत मीरा यांची जवळपास ७ वेळा प्रसुती झाली. विशेष म्हणजे एकही सीझर झाले नाही. त्या आठव्यांदा गर्भवती राहिल्या. प्रसुतीसाठी त्यांना माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घेऊन आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता तुम्हाला वेळ आहे, तुम्ही थांबा...असे सांगितले. त्यानुसार मीरा या आपल्या नातेवाईकासह तेथेच थांबल्या. याचदरम्यान त्यांना कळा सुरू झाल्या. डॉक्टरांना सांगितल्यानंतरही तब्बल सहा तास याकडे कोणीच लक्ष दिले नाही. याचवेळी त्यांना रक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतर यंत्रणा हलली आणि मीरा यांना प्रसुतीगृहात घेतले. अतिरक्तस्त्राव झाल्याने सदरील बाळ गर्भातच दगावले. त्यानंतर मीरा यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. केवळ डॉक्टरांनी वेळेवर तपासणी आणि उपचार केले नाहीत, म्हणूनच मृत्यू झाल्याचा आरोप मीरा यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ्रसदर बाळाचे पावणेचार किलो वजन असल्यामुळे सिझेरियन आवश्यक होते. मात्र, डॉक्टरांनी निर्णय घेण्यात वेळ घातला आणि सिझरेयिन करण्याचे टाळले. ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रियेयासाठी आवश्यक सामुग्री नसल्यामुळे डॉक्टरांनी टाळल्याचे समोर येत आहे.डॉक्टरांकडून नातेवाईकांची दिशाभूल४प्रसुतीदरम्यान मृत्यू झालेल्या मीरा यांची प्रसुतीची आठवी वेळ असल्याने त्यांच्या गर्भशयाची पिशवी कमजोर झाल्याने असा प्रकार झाला आहे. ‘एवढे लेकरं होवू द्यायची काय गरज’ असे सांगून सिझेरियन केले तर परिस्थिती गंभीर होऊ शकते, असे म्हणत डॉक्टरांनी नातेवाईकांची दिशाभूल केल्याचे सांगण्यात येते.आईला पाहूनमुलींचा हंबरडा४सकाळी आपली आई किती चांगली होती. आम्हा सर्वांना बोलून गेली. रात्री आपल्या आईचा मृतदेहच पाहण्याची वेळ या अभागी सात बहिणींना आल्याने त्यांनी आई...आई...म्हणत हंबरडा फोडला. यामुळे नातेवाईक व ग्रामस्थांनीही अश्रूंना वाट मोकळी करून दिली. या दुर्दैवी घटनेने मन हेलावून गेले होते.
डॉक्टरांच्या हलगर्जीमुळेच ‘त्या’ मातेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:10 AM
माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी रात्री मीरा रामेश्वर एखंडे या महिलेचा प्रसुती दरम्यान बाळासह मृत्यू झाला होता. यास डॉक्टरांची हलगर्जीच जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
ठळक मुद्देनातेवाईकांचा आरोप : प्रकरण दडपण्यासाठी मध्यरात्री १ वाजता केले शवविच्छेदन