कडा : रविवारी दुपारच्या सुमारास घरापासून जवळच असलेल्या विहिरीत पडल्याने नवविवाहितेचा मुत्यु झाल्याची घटना देऊळगावघाट येथे घडली. वैष्णवी योगेश सुरेकर असे मयत महिलेचे नाव आहे.
रांजणी ता पाथर्डी येथील वैष्णवी हिचा विवाह नऊ महिन्यापुर्वी आष्टी तालुक्यातील देऊळगावघाट येथील योगेश सुरेकर याच्याशी झाला होता. पण रविवारी दुपारी ती घरापासून जवळच असलेल्या विहिरीत पडल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास वैष्णवी योगेश सुरेकर (वय २०) हिचा मृतदेह विहिरीत आढळून आला. त्या नवविवाहितेच्या मुत्युचे कारण समोर आले नाही. अंभोरा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल लोंखडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत आकस्मिक मुत्युची नोद अंभोरा पोलिस ठाण्यात करण्यात आली. कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले आहे. मुलीच्या नातेवाईकांकडून तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
===Photopath===
080321\nitin kmble_img-20210308-wa0025_14.jpg