सात महिलांसह १९ बळींची नोंद
दरम्यान, मंगळवारी १९ जणांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. यात पिंपळटक्का (ता.वडवणी) येथील ७५ वर्षीय महिला, परळीतील ६० वर्षीय पुरुष, केज तालुक्यातील सारणी येथील ६५ वर्षीय पुरुष, पारगाव (ता.बीड) येथील ७० वर्षीय पुरुष, केज शहरातील ६५ वर्षीय महिला, सिरसमार्ग (ता. गेवराई) येथील ६५ वर्षीय पुरुष, बीडमधील संत नामदेवनगरातील ७७ वर्षीय पुरुष, बालेपीरमधील २६ वर्षीय पुरुष, तालुक्यातील घारगाव येथील ६५ वर्षीय महिला, अंबीलवडगाव येथील ६० वर्षीय महिला, अंजनडोह (ता.धारूर) येथील ६५ वर्षीय पुरुष व ७२ वर्षीय पुरुष, पाटोदा तालुक्यातील पाचंग्री येथील ७७ वर्षीय पुरुष, दासखेड येथील ६७ वर्षीय पुरुष, अंबाजोगाई शहरातील ५८ वर्षीय पुरुष, शहरातीलच रोहिदासनगरमधील ७३ वर्षीय पुरुष, प्रशांतनगरातील ५१ वर्षीय महिला, गढी (ता. गेवराई) येथील ८० वर्षीय महिला, केज तालुक्यातील लाडेगाव येथील ६४ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.