बीड : जिल्ह्यात कोरोनामुळे होणारे मृत्युसत्र कायम आहे. सोमवारी आणखी आठ रुग्णांचा जीव कोरोनामुळे गेला. तसेच १०८६ नवे रुग्ण आढळले तर ९५२ जणांनी कोरोनावर मात केली. त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले.
सध्या जिल्हाभरात ५ हजार ६८६ रुग्ण उपचाराखाली आहेत. जिल्ह्यात रविवारी कोरोना संशयित असलेल्या ३ हजार ५५७ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. पैकी २ हजार ४७१ एवढ्या लोकांचा अहवाल निगेटिव्ह आला तर १ हजार ८६ लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. नव्या बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील २०३, आष्टी ९८, बीड २४६, धारूर ६२, गेवराई ९९, केज १०९, माजलगाव ४९, परळी १०६, पाटोदा ४१, शिरूर २१, वडवणी ५२ येथील रुग्णांचा समावेश आहे. आता एकूण बाधितांची संख्या ४८ हजार ३७८ एवढी झाली आहे. सोमवारी दिवसभरात ९५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आता एकूण कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा ४१ हजार ८४० एवढा झाला आहे.
आठ मृत्यूसह संख्या ८५२
जिल्ह्यात सोमवारी आरोग्य विभागाच्या पोर्टलला आठ मृत्यूची नोंद झाली. यात अंबाजोगाई तालुक्यातील ९० वर्षीय महिला, केज तालुक्यातील युसूफवडगाव येथील ७५ वर्षीय पुरुष, धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथील ३६ वर्षीय पुरुष, केज शहरातील ६० वर्षीय पुरुष, माजलगाव तालुक्यातील वांगी येथील ७५ वर्षीय पुरुष, पाटोदा शहरातील ६५ वर्षीय महिला, अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील ५५ वर्षीय पुरुष, अंबाजोगाई शहरातील सिल्व्हर सिटी भागातील ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे. आता एकूण मृत्युसंख्या ८५२ एवढी झाली आहे. आरोग्य विभागाने ही माहिती दिली.