शहरातील अभय संजय पवार हे खासगी गॅस एजन्सी चालवितात. ८ सप्टेंबर रोजी त्यांना दोन अनोळखी क्रमांकांवरून कॉल आला. ‘मी आर्मीमधून बोलतोय, आमचा अंबेजोगाई येथे कॅम्प होणार आहे. त्यासाठी आम्हाला १५ व्यावसायिक गॅस कनेक्शन पाहिजेत. त्याचे पैसे आमच्या हेड ऑफिसवरून रिफंड होतील, असे फोनवरून बोलणाऱ्या अनोळखी व्यक्तीने पवार यांना सांगितले. त्यानंतर, त्याच्यावर विश्वास ठेवून पवार यांनी त्या व्यक्तीला ९ हजार रुपयांची रक्कम पाठविली. त्यानंतरही संबंधिताने ऑनलाइन चालू आहे, असे सांगत वेळोवेळी असे एकूण १ लाख ३५ हजार ४१५ रुपये पाठविण्यास भाग पाडले. ही रक्कम पाठविल्यानंतर पवार यांना कसलाही रिफंड मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, त्यांनी १० सप्टेंबर रोजी शहर ठाण्यात फिर्याद नोंदविली. यावरून अज्ञातावर गुन्हा नोंद झाला आहे. पो.नि.बाळासाहेब पवार तपास करत आहेत.
आर्मीतील अधिकारी असल्याची बतावणी करून व्यापाऱ्याची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 4:38 AM