लोकमत न्यूज नेटवर्कबीड : प्रादेशिक साखर संचालक औरंगाबाद विभाग कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ.प्रकाश पोपळे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद विभागातील ऊस उत्पादक शेतकरी, कारखानदार, व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. कारखान्यांनी एकरकमी शेतकऱ्यांना पैसे देण्याचे मान्य करण्यात आले, यावेळी बीड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.चालू गळीत हंगामातील ९.५० रिकव्हरी बेस सरसकट धरून, एफआरपी सह एकरकमी विनाकपात पाहिली उचल देण्याचे कारखान्यांकडून मान्य करण्यात आले.साखरेचे दर वाढल्यानंतर २०० रु. प्रति टना प्रमाणे थेट ऊस गाळप केलेल्या संबंधित शेतकºयांच्या खात्यात वर्ग करण्याचे यावेळी मान्य करण्यात आले. तसेच चालू गाळप हंगामात विनापरवाना कारखाने चालू केलेल्यांवर दंडात्मक, तथा फौजदारी कारवाई करण्याचे आदेश पारित करण्यात आले.थकीतसह ऊस बिल दिल्याशिवाय गाळप परवाना दिला जाणार नाही, काटा तपासणी भरारी पथका मार्फत तपासणीसाठी तत्काळ समिति नेमण्यात येईल अशा अनेक मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या होत्या, त्या मान्य करत असल्याचे लेखी पत्र संबंधीतांनी यावेळी दिल्याचे स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुलदिप करपे यांनी सांगितले.युवती आघाडी प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे, जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, धनंजय मुळे, राजू गायके,गेवराई ता अध्यक्ष राजेंद्र डाके पाटील,उद्धव साबळे,वशिष्ठ बेडके,अॅड. रामेश्वर खरात, डॉ. बळीराम शिंदे,कैलास मुळे, आदींसह बीड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीनंतर निर्णय; कारखान्यांना द्यावी लागणार एकरकमी उचल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:29 AM