शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

बोगस पदोन्नतीबाबत होणार आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:29 AM

सेवा ज्येष्ठतेमध्ये बसत नसताना व अधिकृतपणे निवड झालेली नसताना बोगस पदोन्नती घेतल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या धारुर तालुक्यातील पाच शाळांच्या मुख्याध्यापकांची २२ आॅक्टोबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या समक्ष सुनावणी होणार आहे.

ठळक मुद्देतत्कालीन जि.प. सीईओंनी आदेश देऊन घेतली माघार : सेवा ज्येष्ठतेसाठी पात्र नसताना लाटला लाभ

अनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सेवा ज्येष्ठतेमध्ये बसत नसताना व अधिकृतपणे निवड झालेली नसताना बोगस पदोन्नती घेतल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या धारुर तालुक्यातील पाच शाळांच्या मुख्याध्यापकांची २२ आॅक्टोबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या समक्ष सुनावणी होणार आहे. जिल्ह्यातील बोगस पदोन्नतीचा लाभ उचलणाºया मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, प्राथमिक पदवीधरांच्या संदर्भात ‘लोकमत’ने २१ आॅगस्ट रोजी वृत्त प्रकाशित करुन जिल्हा परिषद प्रशसनाचे लक्ष वेधले होते.तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जावळेकर यांच्या कार्यकाळात पदोन्नतीचे आदेश देण्यात आले होते. यात ५ मुख्याध्यापक, ४ केंद्रप्रमुख, ३ प्राथमिक पदवीधरांचा समावेश होता. विशेष म्हणजे हे शिक्षक सर्व शिक्षा अभियानासाठी घेण्यात आले होते. सेवा ज्येष्ठता सूची तसेच पदोन्नती समिती नसताना त्यांना पदोन्नत्या देण्यात आल्या होत्या. दरम्यान ही बाब नियमबाह्य असल्याचे लक्षात येताच हे आदेश आपण दिलेले नाहीत व तसे असेल तर परत घेतो असे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी स्पष्ट केले. याच कालावधीत इतर काही शिक्षकांना विस्तार अधिकारी तर काहींना ज्येष्ठता यादीत नसताना प्राथमिक पदवीधर म्हणून नियमबाह्य पदोन्नत्या देण्यात आल्या. त्यामुळे पात्र शिक्षकांवर पदोन्नतीच्या बाबतीत अन्याय झाला.शिक्षण विभागातून आदेश प्राप्त करत हे १२ शिक्षक चार वर्षांपासून नियमबाह्यपणे अद्यापही काम करत होते. त्यांनी असे आदेश कसे व कोठून मिळाले, याचा शोध घेण्याची गरज लोकमतने २१ आॅगस्ट रोजीच्या बातमीत नोंदविली होती. पाच मुख्याध्यापकांना प्राप्त आदेश खरे की खोटे याबाबत सुनावणीत संपूर्ण माहिती पुढे येणार आहे.नियमबाह्य आदेशाने पदोन्नतीचे लाभ भोगणाºया शिक्षकांना आतापर्यंत कोणाचे अभय मिळाले, वरिष्ठांपासून ही माहिती कशी काय दडविली ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाच मुख्याध्यापकांच्या सुनावणीनंतर विस्तार अधिकाºयांची देखील सुनावणी होणार असल्याचे अधिकारिक सूत्रांनी सांगितले.धारुर तालुक्यातील ५ मुख्याध्यापकधारूर तालुक्यातील गावंदरा प्राथमिक शाळेचे (आंबेवडगाव केंद्र) मुख्याध्यापक आश्रुबा रावसाहेब तिडके, देवदहिफळ केंद्रांतर्गत चाटगाव येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन मुंडे, आंबेवडगाव केंद्रांतर्गत चारदरी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दत्ता घोळवे, धारुर केंद्रांतर्गत घागरवाडा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रामहरी गांधले, व धारुर येथील कन्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर शिंदे या पाच जणांना सुनावणीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. पदोन्नतीने मुख्याध्यापकपदी निवडीबाबत ठोस पुरावे तसेच लेखी म्हणणे सादर करण्याबाबत सुचित केले आहे.

टॅग्स :Beedबीडzpजिल्हा परिषद