लोकार्पणप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. महादेव चिंचोळे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजय कदम, गेवराई ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र पेंगुलवार, आदी मान्यवर उपस्थित होते. गेवराई तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळत नसल्यामुळे त्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे शारदा कोविड सेंटरमध्ये शासनाच्या आर्थिक मदतीशिवाय स्वखर्चाने १८ ऑक्सिजन बेडचा सुसज्ज विभाग कार्यान्वित केला आहे. ऑक्सिजन सिलिंडर, अंतर्गत लाईन व इतर सर्व आवश्यक उभारणी करण्यासाठी शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत करण्यात आली नाही. यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी कोविड रुग्णांशी संवाद साधून त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.
यावेळी तळेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुदाम पवार यांनी ३०० मास्क, २५ लिटर सॅनिटायझरसह अन्य साहित्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चिंचोळे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. कदम यांच्याकडे सुपुर्द केले. यावेळी सुदाम पवार, डॉ. शिंदे मॅडम, डॉ. राठोड, अक्षय पवार, संदीप मडके, मंगेश खरात, रवींद्र चोरमले, बाळासाहेब चौधरी, सुरेश पवार, ज्ञानेश्वर चौधरी, रामेश्वर गरड, आदी उपस्थित होते.
फोटो : गढी येथे शारदा कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडचे लोकार्पण केल्यानंतर माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. महादेव चिंचोळे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजय कदम व अन्य अधिकाऱ्यांशी सुविधेबाबत चर्चा केली.
===Photopath===
180521\img-20210518-wa0326_14.jpg