जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे खाटा अपुऱ्या पडत आहेत. यात सौम्य लक्षणे असणाऱ्यांची सोय व्हावी, यासाठी कोविड केअर सेंटर सुरू केले जात आहेत. खाटांचा तुटवडा पाहून शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनीही बीडपासून जवळच असलेल्या आंथरवन पिंपरी येथे ५०० खाटांचे सेंटर तयार केले. येथे सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. याचे लोकार्पण शुक्रवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, शिवसेने नेते चंद्रकांत खैरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री बदामराव पंडित, माजी मंत्री सुरेश नवले, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे, किसानसेना प्रमुख परमेश्वर सातपुते, महिला आघाडी जिल्हाप्रमुख संगीता चव्हाण यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री शिंदे म्हणाले, बीड जिल्ह्याला कोणत्याही औषधांची, ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता भासू देणार नाही. नगर विकास खात्याकडून ऑक्सिजन प्लांटसाठी दोन कोटी रुपयांचा निधी तत्काळ देत आहोत. जिल्हा रुग्णालयाला २५ ऑक्सिजन काॅन्सेंट्रेटर आणि एक अत्याधुनिक रुग्णवाहिका दिली असल्याची घोषणाही त्यांनी केली. नगर पालिकेला विद्युत दाहिनीसाठी निधी देणार आहोत, असेही मंत्री शिंदे म्हणाले. याप्रसंगी दिनेश पवार यांनी आश्रमशाळेची इमारत कोविड सेंटरसाठी उपलब्ध केल्याबद्दल शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.
===Photopath===
070521\07_2_bed_13_07052021_14.jpg
===Caption===
कोवीड सेंटरचे उद्घाटन करताना मंत्री एकनाथ शिंदे. सोबत मंत्री संदीपान भूमरे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, चंद्रकांत खैरे, मिलींद नार्वेकर, जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, बाळासाहेब पिंगळे आदी.