अंबाजोगाई : जनकल्याण समिती व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्व बीड यांनी जनसेवेचा नवा आदर्श प्रस्थापित केला असून, आजच्या परिस्थितीमध्ये सामान्य व गरजू लोकांना आयसीयू बेड मिळणे खूप कठीण झाले असताना व दवाखान्यांमधील असलेली ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता लक्षात घेता ऑक्सिजन कॉन्सुरेशन मशीनची गरज असल्याने या लोकहितकारी लोक कल्याणकारी प्रकल्पासाठी पुढाकार घेऊन या मशीनचा लोकार्पण सोहळा ऑनलाइन पद्धतीने पार पडला.
या मशीनद्वारे हवेतून ऑक्सिजन तयार केला जातो, तसेच रुग्णाला तात्काळ ऑक्सिजन उपलब्ध होतो. कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त वाढल्याने बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, परळी, माजलगाव, केज व धारूर या पाच तालुक्यांकरिता तात्काळ ५ मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत आणखीन पाच मशीन उपलब्ध होणार आहेत. याचा उपयोग गंभीर रुग्णांना घरीच बसून ऑक्सिजन मिळेल अत्यंत महत्त्वाची महागडी पण हाताळण्यास सोपी मशीन सामान्य व गरजू रुग्णांना मिळावी यासाठी जनसेवेचा एक नवा आदर्श समोर ठेवत जनकल्याण समिती व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने या मशीचे लोकार्पण करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता लोकार्पण सोहळा ऑनलाइन पद्धतीने झाला. याप्रसंगी मा. जिल्हा संघचालक पूर्वचे उत्तम कांदे, प्रांत कार्यकर्ते बिपिन क्षीरसागर, अंबाजोगाईचे तालुका संघचालक दत्तप्रसाद रांदड, जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह प्रकाशराव जोशी, राष्ट्र संवर्धन मंडळाचे विजयराव वालवडकर, जिल्हा कार्यवाह पूर्वचे शंतनू हिरळकर, कोरोना आपत्ती सहयोग समिती पूर्वचे जिल्हा प्रमुख जयदीप विर्धे, तालुका कार्यवाह वशिष्ठ भोसले व अनेक स्वयंसेवक कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, या मशीनचा लाभ मिळावा यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने व समितीमार्फत गरजूंना याचा वापर करता येईल, त्यासाठी प्रकल्प संयोजक कौस्तुभ कोदरकर व निखिल डिडवाणी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
===Photopath===
080521\img-20210506-wa0186_14.jpg