यावेळी व्यासपीठावर रोटरीचे प्रांत पदाधिकारी निरंजन वाघमारे, संजय गुप्ता, उपप्रांतपाल संतोष मोहिते, रोटरीचे अध्यक्ष डॉ. निशिकांत पाचेगावकर, सचिव कल्याण काळे यांची उपस्थिती होती.
मोटवानी म्हणाले, अंबाजोगाईच्या क्लबने यावर्षी कोरोनाच्या स्थितीवर मात करीत भरगच्च समाज उपयोगी उपक्रम राबवत क्लबचे नाव प्रांतात उंचावले आहे. समाजाच्या उन्नतीसाठी राबविलेले विविध उपक्रम दिशादर्शक ठरले आहेत, असे सांगून त्यांनी क्लबच्या कामाचे कौतुक केले.
यावेळी कोरोना योद्धे डॉ. चंद्रकांत चव्हाण, डॉ. अरुणा केंद्रे, डॉ. बाळासाहेब लोमटे, शेख मुक्तार यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी ऑक्सिजन पार्क परिसरात सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. सूत्रसंचालन भीमाशंकर शिंदे यांनी केले. प्रास्ताविक रोटरीचे अध्यक्ष डॉ. निशिकांत पाचेगावकर यांनी केले. अहवाल वाचन संतोष मोहिते यांनी तर आभार कल्याण काळे यांनी मानले.
यावेळी रोटरीचे सदस्य सुहास काटे, प्रा. दामोदर थोरात, जगदीश जाजू, अरुण असरडोहकर, पद्माकर सेलमुकर, बाबूराव बाभूळगावकर, गोरख मुंडे, अंगद कऱ्हाड, विश्वनाथ लहाने, सचिन बेंबडे, प्रदीप झरकर व पदाधिकारी उपस्थित होेते.