अंबाजोगाई : तालुक्यातील एका गावात पस्तीस वर्षीय विवाहितेचा विनयभंग करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी दीर व सासऱ्याविरूध्द अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणातील पीडित महिलेला घरातील दीर व सासरा गेल्या तीन महिन्यांपासून जाणूनबुजून व घरी कोणी नसल्याचा फायदा घेत मारहाण, विनयभंग व अत्याचार करीत असत, अशी तक्रार फिर्यादीने केली आहे. पीडितेने ही बाब भीतीपोटी काही दिवस सहन केली. परंतु वाढत चाललेला त्रास आणि अत्याचार पाहून अखेर पीडितेने अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात सासरा व दीर यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केली. महिलेच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात सासरा, दिराविरूद्ध विनयभंग व अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मोनाली पवार याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणातील दोन्ही आरोपी अद्याप फरार असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.