धारूर शहरालगत व डोंगराळ भागात वन्यप्राणी व पक्ष्यांची संख्या वाढत आहे. धारूर वनविभागाने हे पक्षी व प्राण्यासाठी उन्हाळ्यात पाण्याची सोय व्हावी यासाठी पानवठे तयार केले आहेत. उन्हाची तीव्रता जसजशी वाढत आहे, तसे पक्षी व प्राणी पाण्याच्या शोधात फिरताना दिसत आहेत. धारूर शहरात वस्तीलगत मोर, हरणासह इतर प्राणी येतात. मोंढा भागात शुक्रवारी सायंकाळी पाण्याच्या शोधात एक हरिण आले होते. मोंढ्याची तटरक्षक भिंतीमध्ये ते अडकले. त्याला बाहेर जाता आले नाही. त्याचा पाठलाग करून कुत्र्यांनी जखमी केले. ही बाब मोंढ्यात काम करणाऱ्या मजुरांच्या लक्षात आली. त्यांनी कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या हरणास वाचवले व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या हवाली केले. या हरणावर शनिवारी सकाळी केज येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात डॉ. मेटे यांनी उपचार केले. यावेळी वनविभागाचे वचिष्ठ भालेराव यांची उपस्थिती होती. त्यांनीच हरणाला वाचविण्यासाठी सर्वाधिक प्रयत्न केले.
फोटो ओळ : धारूर येथील जखमी हरणावर उपचार करताना वैद्यकीय अधिकारी.
===Photopath===
170421\anil mhajan_img-20210417-wa0034_14.jpg