बीड : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गुरुवर्य श्री.ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर यांची बीड शहरातील दत्त मंदिर येथे ६ मार्च ते ८ मार्च २०२१ दरम्यान एकनाथी हरीपाठ या विषयावर प्रवचनमाला संपन्न होणार होती. परंतु, मागील काही दिवसांपासून राज्यासह बीड जिल्ह्यातील कोरोना महामारी लक्षात घेता आणि शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून महाराजांच्या परवानगीने ही प्रवचनमाला पुढील काळासाठी स्थागित करण्यात आली असल्याचे श्री संत सद्गगुरू धुंडा महाराज देगलूरकर सेवा प्रतिष्ठान बीडचे अध्यक्ष प्रवीण इंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
बीड शहरातील दत्त मंदिर, सुभाष रोड,बीड येथे मागील पंधरा वर्षांपासून नारदभक्तिसूत्र या विषयावरील गुरुवर्य ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अमृतवाणीतून प्रवचन मालेचे सातत्यपूर्ण आयोजन केले जात होते. मागील वर्षी या प्रवचन मालेचा समारोप झाला होता. पण बीड शहरातील भाविकांच्या विशेष आग्रहास्तव तीन दिवसीय प्रवचन मालेचे आयोजन करण्यात येणार होते परंतु, महाराष्ट्रातील कोरोणा परिस्थिती आणि शासनाने केलेल्या विनंती वरून पुढील महिन्यातील होणारी एकनाथी हरिपाठ या विषयावरील प्रवचनमाला पुढील काळासाठी स्थगित करण्यात येत असल्याचे श्री संत सद्गगुरू धुंडा महाराज देगलूरकर सेवा प्रतिष्ठान बीडचे अध्यक्ष प्रवीण इंगळे, ह.भ.प एकनाथ महाराज पुजारी, रामराजे राक्षसभुवनकर यांच्यासह प्रतिष्ठानच्या वतीने कळविण्यात आले आहे.