कर्जमुक्ती योजनेपासून शेतकरी वंचित
अंबाजोगाई : आधार लिकिंग व तांत्रिक कारणांमुळे तालुक्यात अद्यापही अनेक शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वंचित आहेत. विविध तांत्रिक कारणांमुळे या शेतकऱ्यांची आधार लिकिंग होत नसल्यामुळे हे शेतकरी अडचणीत आहेत.
रोहयोची कामे ठप्प; काम देण्याची मागणी
अंबाजोगाई : तालुक्यात शेतीचा हंगाम संपत आला आहे. आता रोजगार निर्मिती उपलब्ध होणार नाही. शेतीतील कामेही संपुष्टात आल्याने शेतमजूर कामाच्या शोधात आहेत. अशा स्थितीत शासनाने रोजगार हमीच्या माध्यमातून गाव रस्ते, शिवरस्ते यांची कामे सुरू केली तर शेतमजुरांना गावातच काम उपलब्ध होईल.
रेशन दुकानांमध्ये दरपत्रकाचा अभाव
अंबाजोगाई : तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये दर्शनी भागात अनेक दुकानदारांनी धान्याचे दरपत्रक लावलेले नाहीत. तसेच अनेक दुकानांमध्ये तक्रार पेटीदेखील ठेवण्यात आली नाही. त्यामुळे रेशन धान्याचा उपलब्ध साठा व शासकीय किमती याची माहिती ग्राहकांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे दरपत्रक लावण्याची सक्तीची मागणी होत आहे.