- अविनाश मुडेगांवकरअंबाजोगाई-: वरून हिरवे तर आतून पिवळे असणारे रंगीत टरबूज "आरोही"चे देवळा(ता.अंबाजोगाई)त उत्पादन झाले आहे.या रंगीत टरबुजाला परदेशातुन मागणी होत आहे. ही किमया युवक शेतकरी रविंद्र देवरवाडे यांनी साध्य केली आहे. या प्रयोगातून त्यांनी दोन महिन्यात केवळ ३० गुंठे जमिनीत दीड लक्ष रुपयांचे उत्पादन घेतले आहे.
जे विकेल ते पिकेल या धर्तीवर शेतीत नवीन उत्पादन घेतले तर निश्चितच त्याचा फायदा होतो. देवळा येथील स्मार्ट शेतकरी, पदंमश्री डॉ आप्पासाहेब पवार अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती,असे अनेक शेती आणि सामाजिक पुरस्कार प्राप्त प्रयोगशील शेतकरी रविंद्र भानुदासराव देवरवाडे देवळा ता अंबाजोगाई येथील शेतकरी यांनी नोन यु सिड्स अरोही आणि विशाला अशा दोन प्रजातीच्या रंगीत टरबूजाचे उत्पादन घेतले. हे टरबूज वरून हिरवे आणि आतून पिवळे आणि वरून पिवळे आणि आतून लाल अशा रंगाचे आहे. ३० गुंठे जमिनीत पाच हजार रोपांची लागवड २४ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. पहिली तोड हि २३ जानेवारीला झाली. अवघ्या दोन महिन्यात साधरण ४ किलो ते ५ किलो फळ झाले आहे. लागवड हिवाळ्यातील असून बदलत्या हवामाचा कसलाही फरक पडला नाही. आपल्या महाराष्ट्रात ही उत्तम रंगीत टरबूज येऊ शकते हे या प्रयोगातून शेतकरी रविंद्र देवरवाडे यांनी योग्य नियोजनातून सिद्ध केले.
अशा प्रयोगामुळे शेतकऱ्यांना नवं नवीन वाण बाजारपेठेत मागणी असणारे व उत्तम नफा मिळणून देणारे पीक आहे. रिलायन्स मॉल मुबंई यांनी जागेवर येऊन या टरबुजाची खरेदी केली आहे. हे टरबूज तैवान देशात लोकप्रिय असून याला मोठ्या शहरातही मागणी आहे.देवरवाडे यांनी शेती आधुनिक व तंत्रज्ञानाची जोड देऊन केल्यास निश्चीत यश व मोबदला मिळतो.याची प्रचिती नव्या पिढी समोर ठेवली आहे.