...
वादळामुळे ढगाळ वातावरण
बीड : मुंबईसह कोकण किनारपट्टीला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात झाला. बीड जिल्ह्यातही गेल्या तीन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे नागरिकांना उन्हाच्या कडाक्यातून दिलासा मिळाला आहे.
....
कामगारांना लॉकडाऊन उठण्याची प्रतीक्षा
बीड : जिल्ह्यातील अनेक कामगार पुणे, मुंबई, औरंगाबाद येथे रोजगारासाठी जातात. परंतु सध्या कोरोना लॉकडाऊनमुळे अनेक जण गावी अडकून पडले आहेत. अनेक कंपन्याही बंद आहेत. लॉकडाऊन उठल्यानंतर पुन्हा रोजगारांसाठी मजुरांना शहराकडे जावे लागणार आहे. त्यासाठी कामगारांना लॉकडाऊन उठण्याची प्रतीक्षा लागली आहे.
....
दुसऱ्या डोसपासून अनेक जण वंचित
बीड : जिल्ह्यात अनेक जणांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. गर्दीमुळे लसींचा तुटवडा असल्याने अनेक जण लस घेण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. तरी ज्यांनी अजून दुसरा डोस घेतला नाही, अशा नागरिकांचा आरोग्य विभागाने शोध घेऊन त्यांचे लसीकरण करावे, अशी मागणी होत आहे.
...
शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा
बीड : कोरोना, अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी अडचणीत आहे. शेतमाल असूनही शेतकऱ्यांना माल विकता आला नाही. तरीही अनेकांना मातीमोल भागात शेतीमाल विकावा लागला. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन केंद्र व राज्य सरकारने विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
.....