निवेदनात नमूद केले आहे की २०१४ ते २०१९ च्या दरम्यान धायगुडा पिंपळा ते चुंबळी फाटा हा राज्यमार्ग मंजूर करून काम पूर्ण झाले.
बीड जिल्ह्यातून श्री गजानन महाराज यांची शेगाव ते पंढरपूर ही पालखी लोखंडी सावरगाव ते माळेगाव याच मार्गाने जाते. याच मार्गावर प्रभू श्रीरामाचे मंदिर युसूफ वडगाव येथे आहे. तसेच या मार्गावर संत तुकाराम महाराज यांचे मंदिर व अनेक संत व महंतांच्या पवित्र समाधी आहेत. लोखंडी सावरगाव ते माळेगाव दरम्यान ३० ते ३५ गावे या रस्त्यास जोडलेली आहेत. लोखंडी सावरगाव ते माळेगाव या रस्त्याचे काम नव्याने करण्यात आल्यास या गावाचा दळणवळणचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे लोखंडी सावरगाव ते माळेगाव हा मार्ग नव्याने मंजूर करून या भागातील दळणवळण सुलभ व्हावे व या भागातील गावाचा विकास करण्यासाठी केज मतदारसंघातील लोखंडी सावरगाव ते माळेगाव रस्त्याचे काम नव्याने करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ वासुदेव नेहरकर, पंचायत समिती सभापती विष्णू घुले, भारतीय जनता पक्षाचे सदस्य हनुमंत साने उपस्थित होते