पिंपळनेर जिल्हा परिषदेच्या गटातील ताडसोन्ना, पिंपळनेर, बेडकुचीवाडी, रामगाव, रंजेगाव, नाथापूरसह आदी नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. या भागात सरसकट नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पालकमंत्र्यांना भेटणार असल्याचे पंडित म्हणाले.
विमा कंपनीची वेबसाईट व पोर्टल बंद असून टोल फ्री क्रमांकही लागत नसल्याच्या तांत्रिक अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. शासन निर्णयात पीक नुकसानीची माहिती घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत देण्याची तरतूद केली आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना ७२ तासांच्या मुदतीमध्ये हे शक्य होत नाही. आजवर शासनाने कृषी विभागामार्फत ऑफलाईन अर्ज स्वीकारले. मात्र नुकसानीनंतर ७२ तासांची मुदत पूर्ण होत असल्यामुळे आजपासून क्लेम दाखल करून घेणे बंद केले. याबाबत पंडित यांनी आक्षेप नोंदवत विमा कंपनीने क्लेम दाखल करून घेण्यास ७२ तासांची मुदत वाढवून द्यावी आणि कृषी विभागामार्फत ऑफलाईन पद्धतीने पीक नुकसानीचे क्लेम दाखल करून घ्यावेत, अशी मागणी केली.