शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

रमजानमुळे फळांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 4:42 AM

... खाजगी वाहनांमध्ये मर्यादित प्रवासी अंबाजोगाई : राज्य शासनाने जाहीर केलेल्या नवीन निर्बंधात वाहतुकीला सूट देण्यात आलेली ...

...

खाजगी वाहनांमध्ये मर्यादित प्रवासी

अंबाजोगाई : राज्य शासनाने जाहीर केलेल्या नवीन निर्बंधात वाहतुकीला सूट देण्यात आलेली आहे. मात्र, त्यासाठी काही नियम घालून दिलेले आहेत. याचे पालन खासगी प्रवासी वाहतूकदार करीत आहेत. खासगी टॅक्सीमध्ये केवळ चार प्रवासी बसविण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांनाही सुरक्षिततेची हमी मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

...

मंगल कार्यालय चालकांना आर्थिक फटका

अंबाजोगाई : कोरोना लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका मंगल कार्यालय, लॉनचालकांना बसला आहे. या व्यवसायाशी संलग्न असणारे अनेक व्यावसायिक आहेत. ऐन लग्नसराईच्या वेळी व्यवसाय बंद झाल्याने हजारो कुटुंबावर बेरोजगारीची वेळ आली आहे. त्यामुळे मंगल कार्यालये सुरू करण्यास सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी अशोक खंदारे यांनी केली आहे.

...

वीज उपकेंद्रांची क्षमता वाढवा

अंबाजोगाई : तालुक्यात सध्या विजेच्या समस्येमुळे शेतकरी हैराण झालेले आहेत. मांजरा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, सध्या वीज उपकेंद्रातून होणारा विद्युत पुरवठा अत्यंत कमी दाबाने सुरू आहे. हा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ३३ के. व्ही. उपकेंद्राची क्षमता वाढविण्यात यावी. तरच शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा होईल, अन्यथा पाण्याची उपलब्धता असूनही पिकांना पाणी मिळणार नाही. यासाठी क्षमता वाढवावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शरद इंगळे यांनी केली आहे.

...

कृषी माल वितरण व्यवस्था उभारावी

अंबाजोगाई : कोरोना लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका भाजीपाला उत्पादक शेतक‌‌ऱ्यांना बसत आहे. लॉकडाऊनमुळे एका बाजूला शेतमाल विक्रीचे आव्हान तर दुसऱ्या बाजूला कमी झालेले दर यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या या अडचणींचा विचार करून कृषी माल वितरण व्यवस्था उभारणीसाठी शासनस्तरावर योग्य विचार करण्याची गरज आहे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनोद तापडे यांनी केली आहे.

...