बीड : जिल्ह्यात पावसाअभावी सोयाबीन व कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांचा पेरणीचा खर्च देखील निघणे मुश्किल आहे. त्यामुळे तात्काळ पिकांचे पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.बीड जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, तूर, कडधान्य ही मुख्य पिके आहेत. यामध्ये सोयबीन - २ लाख १७ हजार हेक्टर, कडधान्य - ५५ हजार हेक्टर, तर कापूस -३ लाख ७७ हजार ५१५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेली आहे. मात्र पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांनी माना टाकल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील दोन वर्र्षांपासून सततचा दुष्काळ व नापिकी यामुळे शेतकºयांची आर्थिक स्थिती देखील बिघडली आहे. त्याचबरोबर डोळ््यांदेखत पिकांचे होत असलेले नुकसान पाहून मानसिकता देखील खच्चीकरण होत आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना व शेतकºयांनी केली आहे.तसेच त्याप्रमाणे केंद्र व राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करुन नुकसनाभरपाई द्यावी तरच शेतकºयांना दिलासा मिळणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार रास्तारोकोस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकºयांना दुष्काळ जाहीर करुन एकरी १ लाख रुपये अनुदान देण्याची मागणी निवेदनाद्वारे शासनाकडे करण्यात आली आहे. तसेच बेरोजगार युवकांना अण्णासाहेब पाटील व इतर योजनेच्या माध्यमातून कर्ज वाटप करण्यात यावे, विजबील सरसकट माफ करण्यात यावे, शेतकºयांना पिकविमा रोखून न ठेवता तात्काळ वाटप करावा, जिल्ह्यातील शेतकºयांच्या मुलांना शैक्षणिक शुल्क माफ करुन एसटी बसचे पास मोफत करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या संदर्भात निर्णय न झाल्यास शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने परळी-बीड मार्गावर रास्तारोको करण्यात येणार असल्याचे निवेदन प्रशासनास देण्यात आले आहे.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संखटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, लहू गायकवाड, प्रमोद पांचाळ, मधुकर पांडे, चंद्रकांत अंबाड, परमेश्वर बीर, कमलाकर लांडे, गोवर्धन दुबारे सह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
पिकांचा पंचनामा करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:11 AM
जिल्ह्यात पावसाअभावी सोयाबीन व कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांचा पेरणीचा खर्च देखील निघणे मुश्किल आहे.
ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : पावसाअभावी कडधान्य, सोयाबीन पिकांचे नुकसान