शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
2
कधीकाळी जिगरी दोस्त होते इराण-इस्रायल; जानी दुश्मन कसे बनले? सद्दामच्या इराकवर केलेला हल्ला
3
१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण
4
ख्रिस गेलचा PM मोदींना 'नमस्कार'! भारतीयांना ती शैली भावली; 'युनिव्हर्सल बॉस'ची लक्षवेधी पोस्ट 
5
Sarva Pitru Amavasya 2024: 'या' ठिकाणी करता येते जिवंतपणी श्राद्ध; मात्र हा तोडगा कोणासाठी? वाचा!
6
"रोहित पवार, रोहित पाटील, टोपेंसह ५० उमेदवारांना पाडणार", लक्ष्मण हाकेंची यादी तयार!
7
अजित पवारांनी तटकरे, पटेलांसह घेतली अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यावर चर्चा?
8
Raj Thackeray : "कितीही बेताल वक्तव्य केली तरी..."; गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारलं
9
कमाल! WhatsApp ची मोठी घोषणा, Video कॉलचा आनंद द्विगुणित; बदलणार चॅटिंगचा एक्सपीरियन्स
10
T20 WC 2024 : भारताचा विजयरथ! न्यूझीलंड, आफ्रिकेविरुद्ध 'भारी' सराव; गुरुवारपासून स्पर्धेचा थरार
11
फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा
12
गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी व्यक्त केला संशय
13
मुलगी झाली हो..! खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
14
गुरु-शनी गोचर: ८ राशींचा सुवर्णकाळ, धनलक्ष्मी भरभरुन देईल; नवदुर्गा कृपा करेल, दसरा शुभ होईल!
15
इराण-इस्रायल या दोन्ही दैशांपैकी भारताचा सर्वात जवळचा मित्र कोण?; जाणून घ्या
16
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा!
17
गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती
18
"शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान
19
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
20
Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत

महामार्गावर नामफलक लावण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 4:36 AM

----------------------- पदोन्नती देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी अंबाजोगाई : शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची बदली करण्यापूर्वी पदोन्नती करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी वारंवार केली ...

-----------------------

पदोन्नती देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी

अंबाजोगाई : शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची बदली करण्यापूर्वी पदोन्नती करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी वारंवार केली आहे. मात्र, या मागणीकडे आजपर्यंत दुर्लक्षच करण्यात आले आहे. तरी या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

---------------------------

वाढत्या वीज बिलामुळे ग्राहक त्रस्त

अंबाजोगाई : महावितरण कंपनीकडून वारंवार वीज दरवाढ, अतिरिक्त शुल्क तर कधी अतिरिक्त सुरक्षा रकमेची देयके पाठविली जात आहेत. या मनमानी कारभाराने त्रस्त असलेल्या वीज ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. ही वाढती महागाई व सतत वाढत जाणारे वीज बिल यामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. शासनाने यासंदर्भात ठोस उपाययोजना कराव्यात. वीज ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कल्याण काळे यांनी केली आहे.

-----------------------

रस्त्यावरील सांडपाण्याने आरोग्य धोक्यात

अंबाजोगाई : तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता मोहीम रखडल्याने नाल्या सांडपाण्याने भरल्या आहेत. परिणामी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात नागरिकांनी तक्रारी करूनही ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे नागरिकांत रोष आहे.

------------------------

विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

अंबाजोगाई : तालुक्यातील वीजपुरवठा नेहमी खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांची अनेक शासकीय कामे खंडित होत आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

-------------------------

ग्रामीण भागात शौचालयांचा गैरवापर

अंबाजोगाई : परिसरातील अनेक गावांतील शौचालयांमध्ये गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरुपयोगी वस्तू नागरिक भरून ठेवतात. त्यामुळे ग्रामीण भागात शौचालयाचा गैरवापर होत आहे. तरी नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शौचालयांचा वापर करावा, असे आवाहन ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येत आहे.