परळी : राखेचे प्रदूषण व राख वाहतूक वेगमर्यादेसह नियंत्रित करून सामान्य जनतेच्या आरोग्याचे पर्यायाने माणसांच्या व पशुधनाच्या जीवनाचे, शेतजमिनीचे संरक्षण करावे तसेच अन्य १८ मागण्यांचे निवेदन २१ जानेवारी रोजी नागरिकांच्यावतीने शासनाला देण्यात आले. येथील औष्णिक विद्युत केंद्रातून निर्माण होत असलेल्या राखेच्या प्रदूषणामुळे व अनियंत्रित वाहतुकीमुळे येथील नागरिकांचे आरोग्य, पशुधन, शेती व्यवसाय प्रचंड धोक्यात आले आहेेत. राखेवर अवलंबून असलेल्या वीट भट्ट्यांमुळेही प्रदूषणात मोठी वाढ होत असल्याने मोकळा आणि स्वच्छ श्वास घेण्याच्या भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारावर गदा आली आहे. त्यामुळे योग्य ती कार्यवाही करून सामान्य जनतेला न्याय द्यावा, असे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत प्रदूषण नियंत्रण समितीकडे देण्यात आले.
प्रदूषण नियंत्रणाची शासनाकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 4:31 AM