शिरूरकरांचा पांच दिवसांचा उपवास सुरू
शिरूर कासार : येथील जाज्वल्य देवस्थान असलेले शक्तिपीठ म्हणे कालिका देवी ,देवीचा कुलाचार असलेला नव्याच्या अमावस्येचा कुलाचार अवघ्या पाच दिवसांवर आला असल्याने बुधवारपासून देवी भक्त एक कर्ता प्रतिनिधी पांच दिवसांचा उपवास करत असतो.या काळात पादत्राणे वज्य' असते ,अमावस्येला देवीची पालखी, गंगाजलाने अभिषेक व पुरण पोळीचा नैवेद्य समर्पण केल्यानंतरच शिरूरला नवे गहु खाण्यास सुरूवात होते. तोपर्यंत गिरणीत सुध्दा नवे गहू दळून दिले जात नाही. ही परंपरा आजही शिरूरकर सांभाळत आहे. शासन नियमावलीतच हा कुलाचार उत्सव पार पाडला जाणार असल्याचे कालिका देवी विश्वस्थ अध्यक्ष रोहीदास पाटील व सचिव बापुराव गाडेकर यांनी सांगितले.
आजोळ परिवारास सात क्विंटल धान्यासह किराणाची मदत
शिरूर कासार : तालुक्यातील राक्षसभुवन येथे "आजोळ परिवार " हे निराधार , निराश्रित ,दिव्यांगासाठी हक्काच घर सुरू आहे. मदतीच्या बळावर सुरू असलेल्या या संस्थेस आधार माणुसकीचा ग्रुपचे रणजित पवार व किरण बेद्रे ,कृष्णा आदींनी यांनी मंगळवारी सात क्विंटल धान्य ,किराणा साहित्य ,तसेच अंधांसाठी काठी व फळे भेट दिली. मदतीबद्दल संस्थेचे कर्ण तांबे यांनी आभार मानत ऋण व्यक्त केले.
शिरूर सिंदफना रस्त्यावर खड्डे
शिरूर कासार : तालुक्याच्या ठिकाणी ये जा करण्यासाठी दहा-बारा गावची वर्दळ असलेल्या शिरूर सिंदफना या रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्याने सर्वांनाच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याची दुरूस्तीची गरज असल्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडे केली आहे.
विनामास्क संचार करणा-यावर दंडात्मक कारवाई
शिरूर कासार : कोरोना प्रतिबंधासाठी तोंडावर मास्क लावणे हे अनिवार्य असताना काही लोक विनामास्क संचार करत असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी नगर पंचायतने अडीच हजार रूपये दंड वसूल केला. कामाशिवाय बाहेर फिरूच नका गरज पडलीच तर मास्कचा वापर करणे बंधनकारक असल्याचे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी किशोर सानप यांनी सांगितले.
गावात तोंडाला मास्क तर शेतात मोकळा श्वास
शिरूर कासार : कोरोचा वाढता उद्रेक लक्षात घेता गावांत फिरताना तोंडावर मास्क असणे बंधनकारक असले तरी शेतात काम करणारा शेतकरी मात्र शेतात मोकळा श्वास घेत असल्याचे चित्र शिरूर परिसरातील शेतशिवारात फेरफटका मारल्यावर दिसू आले.