बीड : जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून यामुळे जिल्ह्यातील सात लाख 56 हजार 926 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. याच्या नुकसान भरपाईसाठी शासनाकडे 514 कोटी 80 लक्ष 54 हजार रुपयांच्या निधीची मागणी करणारा प्रस्ताव जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी राज्य शासनाकडे पाठविला आहे.
जिल्ह्यातील सर्व अकरा तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतक-यांचे नुकसान झाले होते यासाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश गाव पातळीवरील यंत्रणांना दिले होते या अनुषंगाने प्राप्त झालेली माहिती एकत्रित करून जिल्ह्यातील बाधित क्षेत्र, शेतकऱ्यांची संख्या आणि नुकसान भरपाई देण्यासाठी अपेक्षित निधी यांची तालुकानिहाय माहिती यासोबत सादर करण्यात आली आहे .
जिल्ह्यातील 8 लाख 24 हजार 759 शेतकऱ्यांची या अतिवृष्टीचा फटका बसला असून पेरणी झालेल्या 7 लाख 56 हजार हेक्टर क्षेत्रावरील शेत पीक हातातून गेले आहे. यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन , कापूस , मका , बाजरी, ज्वारी, तूर, मूग, द्राक्ष , पपई ह्यासह विविध अशी माहिती यासह सादर करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी महसूल, कृषी व ग्रामविकास विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कमीत कमी वेळात पंचनामे करून अहवाल सादर केले आहेत.
असे आहे तालुकानिहाय नुकसानगेवराई तालुक्यातील 1 लाख 36 हजार 521 हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या 128510 शेतकऱ्यां साठी 79 कोटी 77 लक्ष 55 हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. बीड तालुक्यातील 1 लाख 34 हजार 032 हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या 130918 शेतकऱ्यां साठी 84 कोटी 76 लक्ष 20 हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. केज तालुक्यातील 1 लाख 05 हजार 216 हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या 101018शेतकऱ्यां साठी 67 कोटी 31 लक्ष 25 हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. आष्टी तालुक्यातील 1 लाख 23 हजार 200 हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या 74545 शेतकऱ्यांसाठी 38कोटी 18 लक्ष 80 हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. माजलगाव तालुक्यातील 76 हजार 490 हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या 69066 शेतकऱ्यां साठी 46 कोटी 26 लक्ष 65 हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. अंबाजोगाई तालुक्यातील 77 हजार 935 हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या 68248 शेतकऱ्यां साठी 47कोटी 56 लक्ष 39 हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे.
पाटोदा तालुक्यातील 66 हजार 454 हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या 57162 शेतकऱ्यां साठी 33कोटी 39 लक्ष 95 हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. परळी तालुक्यातील 61हजार 101 हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या 68248 शेतकऱ्यां साठी 38कोटी 28लक्ष 33हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. शिरूर कासार तालुक्यातील 54 हजार 576 हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या 57313 शेतकऱ्यां साठी 38 कोटी 18 लक्ष 88 हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. धारूर तालुक्यातील46 हजार 802 हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या 45769 शेतकऱ्यां साठी 27 कोटी 39 लक्ष 24 हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. वडवणी तालुक्यातील 33हजार 571 हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या 32331शेतकऱ्यां साठी 19 कोटी 42 लक्ष 21 हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे.