आहे.
दुकानांवर प्लास्टिक कॅरिबॅगचा सर्रास वापर
बीड : बीड : शहरातील मुख्य बाजारपेठेसह भाजीमंडईत सर्रासपणे दुकानांवर प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर केला जात असल्याचे दिसत आहे. बीड नगरपालिकेचे पथक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. लॉकडाऊन लागल्यापासून शहरात एकही कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. सर्रासपणे दुकानांवर प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर केला जात आहे. यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
माजलगावात भुरट्या चोरांचा वावर
माजलगाव : गाडीतील पेट्रोल, बॅटरी, पाण्याची मोटार, पाईप, वायर अशा कंपाऊंडमधील वस्तुंच्या चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. शहरातील गजानननगर, शाहूनगर, मंगलनाथ कॉलनी, समता कॉलनी भागातील घराच्या कंपाऊंडमधील साहित्याच्या सर्रास चोऱ्या होत आहेत. या चोऱ्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. या चोरांचा तपास लावण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
शेतकऱ्यांना रानडुकरांची धास्ती
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रानडुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. शेतात रानडुकरे पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करीत आहेत. याचा मोठा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांवर रानडुकरांनी हल्ला केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे, तर लहान मुले व महिला रानडुकरांच्या भीतीमुळे शेतात जाण्यास धजावत नाहीत. वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.