आहे.
भाजीमंडईत वाहतुकीची कोंडी बीड : शहरातील भाजीमंडईत प्रत्येक रविववारी आठवडी बाजार भरतो; परंतु येथील अरुंद रस्ते व अस्ताव्यस्त पार्किंगमुळे कोंडी कायम राहत आहे. पालिका अथवा पोलिसांकडून यावर कसलीच कारवाई अथवा उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. नियोजन करून ही कोंडी सोडविण्याची मागणी होत आहे.
स्थानकात अस्वच्छता; आरोग्य धोक्यात
अंबाजोगाई : येथील बसस्थानकात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरल्याने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बसस्थानकाच्या परिसरात ठिकठिकाणी पडलेले खड्डे, त्यात साठणाऱ्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते. तसेच मोकाट जनावरांचा प्रादुर्भावही बसस्थानकात मोठ्या प्रमाणात असल्याने प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते.
पेठ भागात अवैध गतिरोधकामुळे त्रास
बीड : शहरातील पेठ भागात गल्लीबोळात तयार केलेल्या अवैध गतिरोधकांमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा वाहने आदळून नुकसान होते. तसेच अपघाताचा धोका संभवतो. या गतिरोधकामुळे वाहनांची गती कमी होत असलीतरी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.