...
‘सर्वच औषधे ट्रॅक्स फ्री करा’
बीड : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे नागरिकही त्रस्त झाले आहेत. रोजीरोटीचा प्रश्नही निर्माण झाला आहे. नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी कोरोना काळात रुग्णांना लागणारी सर्व प्रकारची औषधे टॅक्स फ्री करावीत, अशी मागणी संभाजी बिग्रेडचे विभागीय अध्यक्ष ॲड. राहुल वायकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
...
हरवलेेले दागिने केले परत
केज : तालुक्यातील एका इसमाचे दहा ग्रॅम वजनाचे दागिने हरवले होते. याची किंमत ५० रुपये होती. हे दागिने केज पोलीस स्टेशनमधील पोलीस आघाव यांंना सापडले होते. त्यांंनी सदर इसमाचा शोध घेतला. खात्री पटविली. त्यानंतर, त्याचे दागिने परत केले. आघाव यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.
....
बीड : मौज प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण करण्यात आले. ४५ वर्षांपुढील नागरिकांंना हे लसीकरण केले. परिसरातील ९१ जणांना ही लस देण्यात आली. यासाठी उपकेंद्राचे अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.