शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
3
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
4
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
5
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
6
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
7
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
8
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
9
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
10
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
11
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
12
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
14
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
15
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
16
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
17
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
18
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
19
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

भाजप-सेनेच्या युतीवर दानवेंची चुप्पी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 12:32 AM

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेची युती होऊन आता आठवडा लोटला आहे. असे असतानाच या युतीच्या घोषणेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे प्रथमच जालना दौऱ्यावर आले होते.

ठळक मुद्देआज सर्व रोग निदान शिबीर : आयुष्यमान योजनेची अंमलबजावणी न केल्यास कारवाई

जालना : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेची युती होऊन आता आठवडा लोटला आहे. असे असतानाच या युतीच्या घोषणेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे प्रथमच जालना दौऱ्यावर आले होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आयुष्यमान या आरोग्य योजनेच्या कार्ड वाटपाचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. यावेळी आपल्या मनोगातात त्यांनी केंद्र सरकारच्या योजनांची जंत्री वाजवली खरी, परंतु शिवसेनेचा नामोल्लेख न करता युतीवरही भाष्य केले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.येथील श्रीकृष्णनगरमध्ये हा कार्ड वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, आ. नारायण कुचे, भास्कर दानवे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, सिध्दिविनायक मुळे, किशोर अग्रवाल, अशोक पांगारकर, धनराज काबलिये आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. भास्कर दानवे यांनी प्रास्ताविकातून आयुष्यमान योजनेतून कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास त्याला पाच लाख रूपया पर्यंतची मदत मिळणार असल्याचे सांगितले.यावेळी अनिरूध्द खोतकर, आ. कुचे यांनी विचार व्यक्त केले. पुढे बोलताना खा. रावसाहेब दानवे यांनी सांगिले की, केंद्र सरकारने उज्वला, जनधन तसेच आयुष्यमान योजना राबवून गरीबांना मदत करण्याचे कार्य केले आहे. एकूणच गेल्या चार वर्षात पंतप्रधान मोदी यांनी श्रीमंत आणि गरीबांतील दरी संपविण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्याचे दानवे म्हणाले. युती झाल्यावर ते पहिल्यांदाच जालन्यात आल्याने त्यांच्याकडून काही राजकीय ऐकायला मिळते काय या विचारात सर्वजण होते, परंतु त्यांनी ते टाळून महागठबंधनवर हल्ला चढवून आमच्यावर जातीयवादी असल्याचा जे आरोप करत आहेत, त्यात तथ्य नसल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पुलोदमध्ये असताना कोणाशी संधान साधून सत्ता चालवली होती, हे त्यांनी आठवून पाहावे असे सांगण्यास दानवे विसरले नाहीत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविदास देशमुख यांनी केले.याचाच एक भाग म्हणून शनिवारी सकाळी सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.भाजप सोबतच शिवसेनचाही उल्लेख करागेल्या चारवर्षापासून शिवसेना आणि भाजपमध्ये सरकारमध्ये राहूनही दुरावा निर्माण झाला होता. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्त्यांच्या घोषणाही बदल्या आहेत, असे सांगून आता आपण युतीने लढणार आहोत. त्यामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थितांकडून केवळ भाजपचा जय जयजयकार केला जात होता, त्यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मार्गदर्शन करताना म्हणाले की, आता भाजप आणि शिवसेनेचा विजय असो, असा उल्लेख करण्याचे आवाहन त्यांनी केल्यावर एकच हशा पिकला. याचे कारण सांगताना अनेक योजना या पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या संमतीनेही तयार झाल्याचे अंबेकर म्हणाले.

टॅग्स :JalanaजालनाRaosaheb Danweरावसाहेब दानवेBJPभाजपाShiv Senaशिवसेना