बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शहरात कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. सकाळपासूनच शांततेत आंदोलन सुरू होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास काही आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जमा झाले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बीड-नगर रोडवर ठिय्या दिला व घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावरच जेवण करून सरकारचा निषेध केला.
या घटनेची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस फौजफाट्यासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झाले. जमावाला रस्त्यावरून बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली. आंदोलनात महिलांचा देखील मोठा सहभाग पहायला मिळाला. या आंदोलकांसोबत उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी चर्चा केली व जमाव पांगवण्यात आला. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शेकडो तरुणांचा जमाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ््याजवळ जमा झाला. त्यांनी घोषणाबजी सुरू केली. शेकडो तरुण पुतळ््याजवळ जमा झाल्यामुळे काही काळासाठी वाहनांची कोंडी झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना बाजूला करीत वाहतूक मोकळी केली. दिवसभर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ तगडा बंदोबस्त होता. तसेच शहरासह जिल्ह्यात सर्वत्र गस्त व नियोजित ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता.
तेलगावात श्रद्धांजली सभातेलगाव : परिसरातील सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या मराठा बांधवांना तेलगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्रध्दांजली अर्पण केली. तसेच तेलगावात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी तेलगाव कोथिंबिरवाडी, भोपा, नित्रूड, कुप्पा, या परिसरातील मराठा बांधव उपस्थित होते. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात होता.
लो. सावरगावात ठिय्यालोखंडी सावरगाव : अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी लोखंडी सावरगाव व परिसरातील श्रीपतरायवाडी, सनगाव, वरपगाव येथील मराठा बांधव, महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.तसेच सर्वत्र १०० टक्के बंद पाळण्यात आला. यावेळी मोर्चात सहभागी झालेल्यांसाठी चहा व नाश्त्याची सोय करण्यात आली होती.
बसच्या १३२२ फेऱ्या रद्दराज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागात आठ आगार आहेत. या आगारांमधून दररोज १३२२ फेºया होतात. प्रतिदिन सरासरी ५१ लाख ६३ हजार रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एकही बस सोडण्यात आली नाही. त्यामुळे जवळपास ९९ हजार ४८३ किलोमीटरच्या फेºया रद्द झाल्याचे एस. टी. च्या सूत्रांनी सांगितले.
साळेगावात व्यवहार ठप्पसाळेगाव : केज तालुक्यातील साळेगाव येथे सर्वच जाती धर्मातील समाज बांधवांनी एकी दाखवून गावात कडकडीत बंद पाळला. जनावरांच्या आठवडी बाजारात एकही जनावर विक्रीसाठी आले नाही. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प होते.
कोळवाडी येथे रास्ता रोकोबीड : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तालुक्यातील कोळवाडी येथे रास्ता रोको आंदोलन झाले. राजेंद्र मस्केसह सकल मराठा समाजाचा सहभाग होता.
आडसमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्राकेज : केज शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. आडस येथे मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली तर कुंबेफळ येथे रस्त्यावर स्वयंपाक करून जेवणासाठी पंगत बसवून आंदोलन करण्यात आले. बंद दरम्यान केज शहरासह तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. केजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकातून काढण्यात आलेला मोर्चा मेन रोड, कानडी रोड, मंगळवार पेठ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, भवानी चौकमार्गे परत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यावर मोर्चाची सांगता करण्यात आली. तसेच तालुक्यातील चंदनसावरगाव येथे युवकांनी मुंडण करून रास्ता रोको आंदोलन करत कडकडीत बंद पाळला. तालुक्यातील लहुरी, युसूफ वडगाव, धनेगाव, वीडा, आनंदगाव आदीसह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. केज मतदार संघाच्या आमदार प्रा. संगीता ठोंबरे यांच्या निवासस्थानी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच तालुक्यात काही ठिकाणी रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त केला. शिवाजी चौकात मुस्लिम समाजातर्फे मोर्चेकºयांना केळी व पाणी वाटप करण्यात आले.
माजलगावात रॅली काढून चार तास रास्ता रोकोमाजलगाव : माजलगाव येथे सकाळी आठ वाजल्यापासूनच येथील संभाजी चौक या ठिकाणी शहरातील तसेच परिसरातील गावांमधील मराठा नागरिक जमू लागले. साधारणत: १० वाजण्याच्या दरम्यान आंदोलन सुरू झाले. यावेळी फडणवीस शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्यात आला. या नंतर आंदोलनाचे स्वरूप बदलून माजलगाव शहरातून रॅली काढून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या परभणी फाटा या ठिकाणी संपूर्ण आंदोलक पोहचले.परभणी फाटा या ठिकाणी रस्तारोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सुमारे चार तास चालले. या ठिकाणी देखील घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. बीड रोड, धारूर रोड परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. आंदोलनादरम्यान एका रुग्णवाहिकेला आंदोलनकर्त्यांनी वाट मोकळी करून दिली. माजलगाव शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी रास्तारोको, ठिय्या आदी आंदोलने करण्यात आले. यामध्ये तालखेड, टाकरवन, गंगामसला, धर्मेवाडी, टालेवाडी, नितरुड, किट्टीआडगाव, पवारवाडी, दिंद्रुड आदी ठिकाणी आंदोलने झाली.
मुस्लिम समाजाकडून पाण्याची व्यवस्थायेथील संभाजी चौक, आंबेडकर चौक व परभणी फाटा या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने आंदोलकांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच मुस्लिम बांधवांचा देखील आंदोलनात सहभाग पहावयास मिळाला.
वडवणीत ३०० तरुणांनी मुंडण करून केला निषेधवडवणी : शहरासह तालुक्यात उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. यावेळी जवळपास ३०० तरुणांनी मुंडण करुन सरकारचा निषध केला.वडवणी शहरात येणाºया जवळपास सर्वच रस्त्यावर आंदोलकांनी ठिय्या दिल्याने तुरळक ठिकाणी वाहने दिसून आली. मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट दिसत होेता. तसेच शहरातील बीड-परळी हायवेवरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात टायर जाळण्यात आले. तीन तास रास्तारोको आंदोलन केल्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बससेवा, शाळा बंद ठेवल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे. शहरात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.दरम्यान, आंदोलन चालू असताना एका रूग्णवाहिकेला तात्काळ रस्ता मोकळा करून देण्यात आला. रूग्णवाहिका गेल्यानंतर पुन्हा आंदोलन सुरू झाले. वडवणी तालुक्यातील पुसरा फाटा येथेही रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
गेवराईत बायपासवर बैलगाड्यांसह चक्का जामगेवराई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागण्यांसाठी मागील सहा दिवसांपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने येथील शास्त्री चौकात ठिय्या आंदोलन सुरू होते. गुरूवारी शहरात व तालुक्यात बंद पाळण्यात आला. शहराबाहेरील बायपासवरील छत्रपती संभाजी महाराज चौकात तीन तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बैलगाड्याही होत्या. यावेळी घोषणाबाजी करत आरक्षणाची मागणी केली. तसेच तालुक्यातील राक्षसभुवन फाटा, धोडंराई फाटा, हिरापुर, तलवाडा, जातेगांव, गढी, सिरसदेवी,राजापुर सह विविध ठिकाणी बंद ठेवुन चक्का जाम आंदोलन करण्यात आले. सर्व आंदोलने शांततेत पार पडली. गेवराई येथील चक्का जाम प्रसंगी गेवराईहुन बीडकडे दोन रूग्णवाहिका रूग्ण घेऊन जात असताना हजारो मराठा बांधव रस्त्यावरून उठले व रस्ता मोकळा करून दिला. यावेळी शिघ्र कृती दलाचे १२० जवान, राज्य राखीव दलाचे ८० या विशेष बंदोबस्तासह गेवराई, बीड पोलीस, होमगार्ड असा तगडा बंदोबस्त तैनात केला होता. जातेगाव येथील आठवडी बाजार बंद ठेवुन चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
आष्टीत तहसीलसमोर ठिय्याआष्टी : आष्टीसह तालुक्यात शांततेत कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी तहसीलसमोर ठिय्या आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. गुरुवारी आष्टी शहरासह कडा, धानोरा, धामणगाव, दौलावडगांव येथे अत्यावश्यक सेवा वगळता व्यापारी, दुकानदार यांनी आपली