माझ्या भगिनींनी रेल्वेतून बीडला येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला का ? -धनंजय मुंडेबीड : माझ्या भगिनींनी रेल्वेतून बीडला येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला का, असा उपरोधिक सवाल करीत मागच्या निवडणुकीत भाजपाने दिलेल्या आश्वासनाची विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी खिल्ली उडवत आठवून करून दिली.राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे बीड लोकसभा उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या रॅलीतच गांधीगिरी दाखवत धनंजय मुंडे यांनी आपले भाषण चालत असतानाच केले. सभेस परवानगी नाकारली म्हणून त्यांनी ही गांधीगिरी केली. तळपणारा सूर्य डोक्यावर आहे. आमच्या आम्हाला तापवत आहे, सत्तांध नेतृत्वाला पराभवाच्या सागरात घातल्याशिवाय हा जनता रु पी बजरंग गप्प बसणार नाही ! असे म्हणत त्यांनी रॅलीमध्ये चालत असतानाच भाषण केले. सत्तेचा दुरुपयोग होत आहे. आपला आवाज कोणीच दाबू शकत नसल्याचे सांगत तुम्ही फक्त सभा नाकारू शकता, जनतेचा आवाज नाही, असे त्यांनी मुंडे भगिनींना ठणकावले देखील. रॅलीतील भाषणात आणि सकाळी झालेल्या पत्रपरिषदेत धनंजय मुंडे यांनी अहमदनगर-बीड-परळी या रेल्वेमार्गाचा उल्लेख केला. रेल्वेचे आश्वासन मतदारांना दिले होते. कुठे आहे रेल्वे? केवळ पोकळ आश्वासने भाजपाने दिलीत, असे त्यांनी सांगितले.
‘रेल्वेने उमेदवारी अर्ज भरायला येणार’ असे मी म्हणाले नव्हते- प्रीतम मुंडेबीड : रेल्वे बीडच्या वेशीजवळ आली आहे. माझ्या मागच्या भाषणात मी रेल्वेने उमेदवारी अर्ज भरायला येईल, असे म्हणाले नव्हते. मात्र, बीड जिल्ह्यातील रेल्वेचे काम प्रगतिपथावर असून, ते लवकरच पूर्ण होणार आहे. सोमवारी डॉ. प्रीतम मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर शहरातून रॅली व सभा झाली. यावेळी धनंजय मुंडे यांनी केलेल्या आरोपाला सडेतोड उत्तर देताना त्या म्हणाल्या, मी बीड जिल्ह्यात रेल्वे आणण्यासाठी प्रयत्न केला आणि करणार आहे.डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रचार सभेला भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री पंकजा मुंडे आदी उपस्थित होते. यावेळी खा. मुंडे म्हणाल्या, माझ्यावर टीका करण्याऐवजी शेतकरी पुत्र म्हणून प्रचार करणाऱ्या धनंजय मुंडे यांनी ज्यावेळी सूतगिरणीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी दबाव टाकून घेतल्या, त्यावेळी त्यांचा शेतकऱ्यांचा पुळका कुठे गेला होता, असा प्रश्न उपस्थित केला.विरोधी पक्षनेते नसून, पक्षविरोधी नेते४पंकजा मुंडे म्हणाल्या, विरोधी पक्षाने दिलेला उमेदवार हा डमी असल्याची चर्चा त्यांच्याच पक्षातील लोक करीत आहेत. स्वत:ला शेतकरी पुत्र समजणारा चंदनाची शेती करीत असल्याची टीका त्यांनी सोनवणे यांच्यावर केली, तर धनंजय मुंडे यांनी दबावापोटी सभेला परवानगी दिली नाही, असा आरोप माझ्यावर केला.आरोप खोडताना पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या सभेसाठी प्रशासनाने दिलेल्या परवानगीचे पत्र त्यांनी उपस्थितांना दाखविले. तसेच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीत गेल्यापासून पक्षाला वाळवी लागल्याची टीका केली. तसेच त्यांनी राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांनाच धोका देऊन संपविण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे ते विरोधी पक्षनेते नसून पक्षविरोधी नेते असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.