कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी निर्मूलनासाठी हे अभियान प्रभारी तालुका कृषी अधिकारी अमृत गांगर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
कृषी अधिकारी के. के. राजबिंडे, कृषी पर्यवेक्षक दिलीप तिडके यांच्यासह सर्व कृषी सहायकांनी शेतकऱ्यांना फरदड कापूस न घेता त्याजागी कापूस काढून गहू हरभरा, ज्वारी आदी पिके घ्यावीत. जेणेकरून पुढील वर्षी कापसाला गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होणार नाही, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
शिरूरसह तागडगाव, पाडळी, दहीवंडी, उकिर्डा चकला, नागरेवाडी,
रायमोहा, टाकळवाडी, खोकरमोह, खालापुरी, निमगाव, येळंब सांगळवाडी, एवलवाडी, हिवरसिंगा, गोमळवाडा, मानूर, जाटनांदूर आदी गावांत हे अभियान राबविण्यात आले.
कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी ऑनलाइन अर्ज
महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावेत, असे आवाहन प्रभारी ता.कृ.अधिकारी अमृत गांगर्डे यांनी केले आहे.
कृषी विभाग व यांत्रिकी उपविभाग यांच्यामार्फत २०२० - २०२१ या अर्थिक वर्षात ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित यंत्रे व अवजारे, पाॅवर टिलर, कांदा चाळ, शेततळे अस्तरीकरण, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, फळबाग लागवड आदी योजनांसाठी शेतकऱ्यांनी HYPERLINK "http://mahadbtmahait.gov.in"mahadbtmahait.gov.in या पोर्टलवर तात्काळ अर्ज भरण्याचे आवाहन गांगर्डे यांनी केले आहे.