लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : आगामी नगरपालिका निवडणुका वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने लढणार आहे. वंचितच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकते. यासाठी कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी तयारीला लागावे, असे आवाहन वंचितचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांनी केले.
आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी सोमवारी अंबाजोगाई येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी बीड जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे हे होते.
मराठा आरक्षणाला सर्वात पहिल्यांदा आघाडीचे प्रमुख ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पाठिंबा दिला. ओबीसींचे राजकीय आरक्षण संपविल्यानंतर आरक्षणाचा प्रश्न बाळासाहेबांनीच ऐरणीवर आणला. मराठा मुस्लीम ओबीसीमधील वंचित कार्यकर्त्यांना बाळासाहेबांनी संधी देऊन न्याय मिळवून दिला आहे. आगामी काळात वंचित बहुजन आघाडी राजकीय पर्याय असणार आहे, असेही हिंगे यांनी सांगितले.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांचा मराठवाडा दौरा येत्या ४ सप्टेंबरला बीड जिल्ह्यात आहे. यावेळी त्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी, शाखा बांधणी, बूथ बांधणीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत, असे अनिल डोंगरे यांनी सांगितले.
याप्रसंगी सुरेश शेळके, रमेश गायकवाड, अनंतराव सरवदे, बबन वडमारे, मिलिंद घाडगे, शैलेश कांबळे, सुरेश बचुटे, प्रसेनजीत रोडे, संजय तेलंग, सुशांत धवारे, चरणराज वाघमारे, बाबूराव मस्के, अमोल हातागळे, रामराजे सरवदे, खाजामियाँ पठाण, ॲड. काळम पाटील, सुभाष जाधव, संजय गवळी, निलेश साखरे, बाबा मस्के, अनिल कांबळे, मारुती सरवदे, अक्षय भूंबे, कपिल शिनगारे, उमेश शिंदे, परमेश्वर जोगदंड, धमांनद कासारे, विशाल कांबळे, गोविंद जोगदंड, स्वप्नील ओव्हाळ, सचिन वाघमारे, बुद्धभूषण कांबळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन गोविंद मस्के यांनी केले. आभार राहुल कासारे यांनी मानले.
230821\img-20210823-wa0023.jpg
अंबाजोगाई येथे वंचित बहुजन आघाडीची बैठक पार पडली.