स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीसीसीएच सेंटरमध्ये दाखल रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय मनुष्यबळ वाढवण्यासाठी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी पावले उचलली. २५ डॉक्टरांच्या प्रतिनियुक्त्या कोविड सेंटरमध्ये केल्या आहेत. आ. नमिता मुंदडा यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत ही मागणी केली होती.
कोविड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली असतानाच वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीसीसीएचमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची होणारी ओढाताण लक्षात घेता या सेंटरला वैद्यकीय महाविद्यालयातील इतर विभागातील डॉक्टरांच्या प्रतिनियुक्त्या कराव्यात, अशी मागणी आ. मुंदडा यांनी नुकतीच स्वारातीच्या अधिष्ठाता कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत केली होती.
सूचनेचे गांभीर्य लक्षात घेत अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी एका आदेशानुसार २५ डॉक्टरांच्या प्रतिनियुक्त्या कोविड सेंटरमध्ये केल्या आहेत.
अधिष्ठाता कार्यालयाच्या या आदेशानुसार मेडिसीन विभागात तात्पुरत्या स्वरूपात पुढील आदेश होईपर्यंत प्रतिनियुक्त्या करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. प्रतिनियुक्तीच्या या आदेशात कनिष्ठ निवासी डॉ. अविनाश सानप, डॉ. संध्या हिलालपुरे, डॉ. पूजा चंडेवार, डॉ. विजयकुमार पवार, डॉ. शरद शेळके, डॉ. साई सवताळे, डॉ. नितीन कांबळे, डॉ. माहेश्वरी चाटे, डॉ. रसिका पेंडोर, डॉ. वर्षा गुट्टे, डॉ. मिताली चाफे, डॉ. लक्ष्मण लाड, डॉ. समीक्षा शेलार, डॉ. डॉ. आरती राठोड, डॉ. अकिताबेन पटेल, डॉ. स्नेहल शिंदे, डॉ. नरेश बुरटे, डॉ. अमोल केंद्रे, डॉ. अश्विन अमृतवार, डॉ. रामा साठवणे यांच्यासह हाऊस ऑफिसर डॉ. अक्षता मस्ती, डॉ. अंजली भणगे, डॉ. नीता जैन, डॉ. आकाश मोरे यांचा समावेश आहे.